
Pune News : पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेनं सासरच्या त्रासाला कंटाळून मे महिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे पुणेच नाही, तर संपूर्ण राज्य हादरलं होतं. तसेच सुनेला त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झालेल्या हगवणे कुटुंबाविरोधात संतापाची लाट उसळली होती. एकापाठोपाठ एक अशा धक्कादायक घडामोडींनंतर आता वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठं पाऊल टाकत आरोपी हगवणे कुटुंबाला दणका दिला आहे.
वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि आत्महत्येप्रकरणी आता पुणे पोलिसांनी 11 आरोपींविरुद्ध 1670 पानांचं दोषारोपपत्र (चार्जशीट) सोमवारी (ता.14) पुणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल करण्यात केले आहे. यामुळे हगवणे कुटुंबाभोवतीचा कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. कारण आरोपी हगवणे कुटुंबियांविरोधात पुणे पोलिसांच्या हाती भक्कम पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. यात पुणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी 11 आरोपींविरोधात 1670 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. राज्य महिला आयोगानं पुणे पोलिसांच्या (Pune Police) चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबप्रकरणी गृहविभागाच्या चौकशीची मागणी केली आहे.
पुणे पोलिसांनी या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात वैष्णवीचा नवरा शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील,नणंद करिष्मा व निलेश चव्हाण हे या प्रमुख आरोपींसह इतर 11 आरोपींचा समावेश आहे. हे आरोपपत्र सुमारे 1670 पानांचं असून यात अवैध व भक्कम पुरावे सादर केल्याचं पुणे पोलिसांनी यानंतर दावा केला आहे.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी तिच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला होता. पुण्यातील सुसगावमध्ये एक नामांकित रिसॉर्ट बुक करून 5000 पाहुण्यांसाठी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.
एका व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार रुपये याप्रमाणे फक्त जेवणाचा खर्च पन्नास लाखाच्या घरात पोचला होता. लग्नातील उंची कपडे, पाहुण्यांच्या स्वागताचा थाट,येणाऱ्या बड्या नेत्यांचा सत्कार यावरच लाखो रुपये खर्च झाले. या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी एका नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आली होती.
अशाप्रकारे फक्त एका दिवसाच्या लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये अनिल कस्पटे यांनी खर्च केले होते. हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांकडून हुंड्याच्या स्वरूपात 51 तोळे सोने, 1 फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी सुद्धा हडपली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.