Shirur Lok Sabha : मंगलदास बांदलांच्या उमेदवारीमुळे शिरूरमध्ये होणार तिरंगी लढत!

Vanchit Bahujan Aaghadi Candidate of loksabha Election 2024 : बारामतीमध्ये वंचितचा सुळेंना पाठिंबा तर शिरूरमध्ये दिला उमेदवार. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
Amol Kolhe, Mangaldas Bandal
Amol Kolhe, Mangaldas BandalSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरू झाले असून, रोज नवीन घडामोडी घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीमधील जागावाटपाची चर्चा फिस्कटली आहे. मात्र, असे असतानाही महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका वंचितने घेतली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramti Lok Sabha) विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वंचितने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार निवडणुकीसाठी दिलेला नाही.

बारामतीबरोबरच शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Loksabha) लढतीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार यांनी शिवसेनेतून आयात करून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांना या मतदारसंघातून संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढत दुरंगी होणार असल्याचे वाटत असतानाच आता या मतदारसंघातून वंचितने आपला उमेदवार जाहीर केला आहे. Vanchit Bahujan Aaghadi candidate Mangaldas Bandal of shirur loksabha Election 2024

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोण आहेत वंचितचे उमेदवार?

राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष असा प्रवास करून आलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना वंचितने (Vanchit Bahujan Aaghadi) शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या मतदारसंघात डॉ. कोल्हे - आढळराव पाटील- बांदल अशी तिरंगी लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मंगलदास बांदल हे अपक्ष म्हणून पुणे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता.

Amol Kolhe, Mangaldas Bandal
Pune Lok Sabha Election 2024: वसंत मोरे 'वंचित'चे उमेदवार, पुण्यात मोहोळ- धंगेकर- तात्यांमध्ये होणार तिरंगी लढत

विधानसभेच्या निवडणुकीत शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना तिकीट देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात आंबेगाव तालुक्यातून त्यांनी विधानसभेची निवडणूक (Vidhansabha Election) देखील लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

खंडणी तसेच फसवणुकीच्या गुन्ह्यात मंगलदास बांदल हे दोन वर्षे तुरुंगात होते. रांजणगाव 'एमआयडीसी'मधून खंडणी मागितल्याचे गुन्हे त्यांच्यावर नोंद आहेत. काही दिवसांपूर्वी जामिनावर ते तुरुंगातून बाहेर आले आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणामध्ये बांदल यांना मे 2021 मध्ये अटकदेखील करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. Lok Sabha election campaign strategies of Vanchit Bahujan Aaghadi

शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Loksabha Constituency) ते इच्छुक होते. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वेळी आणि उमेदवारी जाहीर करताना मंगलदास बांदल तेथे उपस्थित होते. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटदेखील घेतली होती. मराठा समाज आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचीदेखील बांदल यांनी भेट घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या संपर्कातदेखील ते होते. अखेर बांदल यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे आता शिरूरमध्ये चांगली लढत पाहायला मिळणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Amol Kolhe, Mangaldas Bandal
Prakash Ambedkar And Sharad Pawar : वंचितचा बारामतीबाबत मोठा निर्णय; आंबेडकरांची पवारांना साथ

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com