Vasant More : 'वंचित'च्या आणखी एका पराभूत उमेदवाराने घेतली नवीन कार

Vasant More Bought New Car : पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे यांना 31 हजार मतं मिळाली होती. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दीड लाखांच्या फरकाने लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते.
Vasant More  Bought New Car
Vasant More Bought New Carsarkarnama

Vasant More News : लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी नवीन कार घेतली आहे. आपल्या एक्स (ट्विटरवर) 'एक नवी सुरुवात... #Added_88' असे लिहित गाडीसोबत आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ रिलमध्ये वसंत मोरे गाडी खरेदीनंतर स्वतः चालवत ती घेवून जात असल्याचे दिसत आहे.

वसंत मोरे हे पुणे लोकसभा मतदारसंघातून 'वंचित'चे उमेदवार होते. येथून भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी झाले तर, काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे दुसऱ्या क्रमांकावर तर वसंत मोरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

पुणे लोकसभा निवडणुकीत वसंत मोरे Vasant More यांना 31 हजार मतं मिळाली होती. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे दीड लाखांच्या फरकाने लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते. पराभवानंतर मोरे यांनी ते वंचित सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, वसंत मोरे यांनी घेतलेली कार ही एमजी ग्लोस्टर असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

लातूरचा उमेदवारही चर्चेत

लोकसभा Lok Sabha निवडणुकीत लातूर मतदारसंघातून पराभूत झालेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर यांनी एकाच दिवशी चार कोटींच्या दोन गाड्या बुक केल्याने सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केल्याची घटना दहा दिवसापूर्वी घडली होती. त्यावर नरसिंग उदगीरकर यांच्या मुलाने आपल्या परिवाराने वडिलांना गाडी गिफ्ट दिल्याचे सांगत ट्रोल करणारांना उत्तर दिले होते.

Vasant More  Bought New Car
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पिंपरीत अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार गटात इन्कमिंग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com