Sharad Pawar Vs Ajit Pawar : पिंपरीत अजित पवारांना मोठा धक्का! शरद पवार गटात इन्कमिंग

Ajit Pawar group Former corporator Will Be join Ncp Sharad Pawar group : शरद पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड मधील काही माजी नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. आजही काही लोक भेट घेणार आहेत.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला शरद पवार गटाने धक्का दिला आहे. पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेसह 16 माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली. पाच जुलैला शरद पवार गटात या माजी नगरसेवकांची प्रवेश होण्याची शक्यता आहे. आज (रविवारी) पुन्हा विलास लांडेंच्या उपस्थितीत होणार भेट होणार, असे वृत्त 'साम' टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

लोकसभेच्या निकालानंतर अनेक पदाधिकारी, नेत्यांचा ओढा हा महाविकास आघाडीकडे वळला आहे. ठाकरे गटाने गद्दारांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले आहे. तर, शरद पवार गटाकडून काही जणांना प्रवेश दिला जाईल असे स्पष्ट केले होते.

माजी नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीवर शरद पवार Sharad Pawar म्हणाले, पिंपरी चिंचवड मधील काही माजी नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. आजही काही लोक भेट घेणार आहेत. याचा मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहून असं त्यांना वाटत आहे. जे काही पूर्वी निर्णय घेतले ते हिताचे नव्हते या निष्कर्षापर्यंत आता ते लोक पोचू लागले आहेत. पक्षांमध्ये येणाऱ्यांचा आम्ही स्वागत करू, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Video Sharad Pawar : निवृत्ती कधी घ्यावी? शरद पवारांनी सांगितलं योग्य 'टायमिंग'

शरद पवार गटात इन्कमिंग वाढत आहे. पक्षांमध्ये येण्यासाठी शरद पवार यांच्यात रोज नवनवीन नेते भेटी घेत आहेत. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले,'सध्या मला रोज दोन ते तीन तास पक्षांमध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांना भेटण्यासाठी काढावे लागतात.

विधानसभेची तयारी

शरद पवार विधानसभेच्या Assembly Elections तयारीला लागले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी मित्रपक्षांना जागा देणे ही आमची जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्याकडे कोणत्या जागा येणार आहेत, याबाबत सुरुवातीला चाचपणी करू आणि नंतर तरुण पिढीला जास्तीत जास्त प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेऊ, असे म्हणत तरुणांना तिकीट देण्याचे संकेत दिले आहेत.

Sharad Pawar, Ajit Pawar
Ram Shinde And Manisha Kayande : राम शिंदेंची 'रत्नदीप'वर लक्षवेधी; मनीषा कायंदे म्हणाल्या, 'प्रकरण मिटवायचा...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com