Ladki Bahin Yojana:...तर दीड हजारांसाठी रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही; 'लाडकी बहीण' बरोबर ही योजना आणा!

Vasant More advice to cm eknath shinde Mukhyamantri Ladki Bahin Yojana: संपत्तीसाठी भावाला वेठीस धरणाऱ्या बहीणी आणि मेहुण्याला सहीसाठी नाडणारे दाजीच जास्त लाईनमध्ये उभे दिसतात, असे वसंत मोरे म्हणाले.
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Pune News: सरकारची महत्वकांशी लाडकी बहीण योजनेवरून (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) सध्या आरोप प्रत्यारोपांचा राजकारण सुरू आहे. इकडे राजकारण सुरू असताना दुसरीकडे या योजनेचे कागदपत्र गोळा करण्यासाठी सध्या महिलांच्या सरकारी कार्यालयांवर रांगाच रांगा लागल्याचे दिसून येत आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी सरकारला सल्ला दिला आहे.

लाडकी बहीण योजना घोषित केल्यानंतर महिलांची कागदपत्र जमवाजमव करण्याची लगबग पाहायला मिळत आहे. सरकारने योजनेचा लाभ घेण्यासाठी मुदतवाढ दिली असली तरी सरकारी कार्यालय शाळा आणि सुविधा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लाडकी बहीण योजनेबरोबर आणखी एक योजना आणण्याचा सल्ला दिला आहे.

पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, "राज्य सरकार काय किंवा केंद्र सरकार काय एकाच माळेचे मनी, मला तर आठवतंय तुम्हाला आठवतंय का पाहा...? केंद्र सरकारने राबवलेली पाच लाख रुपयांची आरोग्य विमा योजना... त्याही वेळी अनेक नगरसेवकांच्या ऑफिसमध्ये अशीच गर्दी झाली होती...कार्ड काढून दिले परंतु आजपर्यंत कोणालाही 5 लाख रुपयांची हॉस्पिटलमध्ये मदत झाल्याचे ऐकवीत नाही. यामुळे नगरसेवकांना शिव्या देणारी जनता मात्र गल्लोगल्ली आजही दिसते..आता फक्त ठिकाण बदललाय...

Vasant More
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: 'लाडली बहीण'ची आर्थिक लूट करणं तलाठ्याला भोवलं; निलंबनानंतर आता गुन्हा दाखल

एखादी सरकारी योजना तेव्हाच फसते जेव्हा ती योजना घाई गडबडीत बनवली जाते आणि ती अशा लोकांना राबवायला लावली जाते ज्याची त्यांना काहीही माहिती नसते. या लाडकी बहीण योजने सोबतच सरकारने एक योजना अजून चालू करावी. गावोगावी संपत्तीवरून चालू असणारी बहीण भावांची भांडणे सोडवण्यासाठी एखादी समन्वय समिती करावी. तसे केल्यास दीड हजार रुपयांसाठी लाईन मध्ये उभी राहण्याची वेळ आमच्या कोणत्याच बहिणीवर येणार नाही कारण आज संपत्तीसाठी भावाला वेठीस धरणाऱ्या बहीणी आणि मेहुण्याला सहीसाठी नाडणारे दाजीच जास्त लाईनमध्ये उभे दिसतात, असे मोरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com