Vasant More : मतभेदाचं रूपांतर मनभेदात; मोरेंनी मनातील खदखद व्यक्त करत नेत्यांची नावेच घेतली!

Vasant More : मला मिळालेलं 'राज'कीय ग्लॅमर काही लोकांना खुपत असेल.
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Vasant More : पुणे मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांकडून होणारी घुसमट सरकारनामाशी संवाद साधताना जाहीरपणे बोलून दाखवली. पक्षात आपल्याला एकटे पाडलं जात आहे. वसंत मोरे पक्षातून बाहेर पडावा यासाठी पक्षातल्याच नेते प्रयत्न करतायेत, अशी आपल्या मनातली खदखद ही त्यांनी व्यक्त केली. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा आहे, असेही ते म्हणाले.

वसंत मोरे म्हणाले, मी आणि माझ्या सहकाऱ्यांमध्ये मतभेद होते. २००७ पासूनच मी, किशोर शिंदे आणि बाबू वागस्कर पुणे सभागृहात होतो. २०१२ ला सुद्धा आम्ही तिघे सभागृहात होतो. माझी विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली होती. यावेळी शिंदे आणि वागस्कर माझ्यासोबत काम करायचे. मधल्या काळात वागस्कर गटनेते झाले. आम्ही तिघेही गटनेते होतो. मी सर्वात जास्त काळ गटनेता राहिलो आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत मी एकटा निवडून आलो. वागस्कर आणि शिंदे यांचीसभागृहाशी नाळ तुटली. आमचा फार कमी संपर्क झाला.

Vasant More
Modi : मोदी म्हणाले, आज संकष्टी चतुर्थी आहे, टेकडीच्या गणेश बाप्पांना माझे वंदन…

"मागील तीन चार वर्षांमध्ये पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं होतं. एकमेकांचे स्वभाव बदलले. काही विषयात आमचे कायम खटके उडायचे. वाद वाढत जाऊन, मतभेदाचं रूपांतर मनभेदात होऊ लागलं. पक्षात मला एकटं पाडण्यासाठी प्रयत्न होतायेत का? असं मला वाटायला लागलंय.अशी मनातली खदखद मोरेंनी सरकारनामाशी संवाद साधताना बोलून दाखवली.

Vasant More
Pankaja Munde : माफी मागितल्यावर माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती..

बाबू वागस्कर यांनी माझ्याविषयी जे बोलले की, 'नक्की त्यांना इतर पक्षाकडून ऑफर का येत आहेत? हे तपासून पहा.' आता भाजपने आणि राष्ट्रवादीवाल्यांनी मला पत्र देऊन बोलवायचं का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा आहे, ते पुण्यात आल्यावरच मी पक्ष कार्यालयातआवर्जून उपस्थित असतो, इतर वेळी आपण कार्यालयात जात नाही, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com