
Vasant More : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही एसटीमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्वारगेटमधील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले. वसंत मोरे यांनी स्वारगेटमधील सुरक्षारक्षाकांच्या कॅबिनची तोडफोड केली.
स्वारगेट एसटी स्थानकातून फलटण येथे जाणाऱ्या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार घडल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी थेट स्वारगेट येथील आगार येथे जाऊन सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. स्वारगेट स्थानकाच्या परिसरामध्येअनेक गंभीर प्रकारच्या घटना घडत असल्याचा त्यांनी दावा देखील केला. तसेच सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक परिसरात शेकडो कंडोम पडलेत, म्हणजे इथे दररोज बलात्कार होतात, मग इथे सुरक्षा रक्षकांची केबिन कशाला आहे? असा संतप्त सवाल देखील विचारला.
याबाबत माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आहेत. हे वीस सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काहीच नाही. त्यामुळे ही सुरक्षा केबिनमध्ये आम्ही फोडली.
'घडलेला प्रकार अतिशय संताप जनक असून सुरक्षारक्षकाच्या केबिन समोर हा सगळा सगळा प्रकार घडला असेल तर याला सर्वस्वी या एसटी सुरक्षा व्यवस्था जबाबदार आहे. या सर्व प्रकारात सुरक्षा कर्मचाऱ्यांचा देखील हात असू शकतो, असा देखील संशय वसंत मोरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे सुरक्षा कर्मचारी जर अशा प्रकारचं चुकीचं काम करत असतील तर त्यांना त्या केबिनमध्ये बसण्याचा अधिकार नाही म्हणून आम्ही केबिनची तोडफोड केली.', असे देखील म्हणाले.
स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद पडलेल्या एसटीमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला आहे. सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे अशी मागणी वसंत मोरे यांनी केली.सर्व प्रकरणांमध्ये आता सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित आगार प्रमुखा यांच्यावर देखील कारवाई होणे अपेक्षित आहे. जर अशी कारवाई न झाल्यास आगामी काळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अधिक आक्रमकपणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील वसंत मोरे यांनी यावेळी दिला.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.