Vasant More News: " गटनेते अन् शहराध्यक्षपद दिले; आता इच्छाच असेल तर..."; मोरेंचं सूचक विधान

Mns Pune Lok Sabha Constituency:वसंत मोरे यांची भूमिका
Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Sainath Babar, Vasant More, Babu WagaskarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महापालिकेतील गटनेतेपद दिले, शहराध्यक्षपद दिले, आता त्यांनी खासदारकीची इच्छा व्यक्त केली तर साईनाथ बाबर यांना ती देखील देऊन टाकू अशी भूमिका शहर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी घेतली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले तर साईनाथ बाबर यांना शंभर टक्के पाठींबा देणार असेही मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नसतानाही देशात प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, भाजपसह आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील इच्छूकांनी आतापासून उमेदवारीवर आपला दावा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे (MNS) देखील महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघावर लक्ष देणे सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून यासाठी शहर पातळीवरील नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. यातील दोन ते तीन बैठका पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबरोबर मुंबई येथे देखील पार पडलेल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात येत असलेल्या पुणे, बारामती, शिरुर तसेच मावळ लोकसभेची जागा लढविण्याबाबत चाचपणी केली जात आहे. यासाठी शहर पातळीवरील पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Maharashtra DGP : राज्याचे नवे पोलिस महासंचालक कोण,विवेक फणसळकर की रश्मी शुक्ला?

पुणे लोकसभेची जबाबदारी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून शर्मिला ठाकरे या देखील गेल्या काही दिवसांपासून सतत पुणे दौऱ्यावर येत आहेत. बारामती लोकसभेसाठी पक्षाचे पालिकेतील माजी गटनेते आणि शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत त्यादृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यासह शिरुर, मावळ साठीही अनेक इच्छुक मनसेकडे आहेत. पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनीही पुणे लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे जागा एक आणि इच्छुक अनेक अशी काही स्थिती मनसेमध्ये झाली आहे.

बाबर यांनी व्यक्त केलेल्या इच्छेबद्दल वसंत मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, वसंत मोरे, साईनाथ बाबर हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. काही वर्षांपूर्वी बाबर यांनी पालिकेत गटनेता होण्याची इच्छा व्यक्त केली. मी गटनेतेपद दिलं. त्यानंतर त्यांनी शहराध्यक्ष मागितले मी ते देखील दिले. जर त्यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली तर खासदारकी देखील देऊन टाकू. 'ठाकरे कुटुंब माझ्यासाठी देव आहेत'. सर्वात आधी मी खासदारकीची इच्छा व्यक्त केली होती. मी पुणे लोकसभा लढवली तर 100 टक्के जिंकून दाखवेन, असेही वसंत मोरे म्हणाले.

Sainath Babar, Vasant More, Babu Wagaskar
Supriya Sule On BJP: 'आम्ही सतरंजीही उचलायला तयार असतो...'; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com