Pune News : बदलापूर येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थिती लावत सरकारच्या महिला सुरक्षतेबाबतच्या धोरणावर सडकून टीका केली.
सुप्रिया सुळे म्हणल्या, सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घटनांमुळे महिला आता म्हणत आहेत, 'आम्हाला दीड हजार रुपये नको आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो महिलांना सुरक्षित ठेवा'. ही महिलांची भावना आहे.
बदलापूर येथील घटनेमध्ये सरकार, ज्यांनी बलात्कार केला त्याची चौकशी करण्याऐवजी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केल तर या महायुती सरकारमध्ये तो गुन्हा आहे.
बलात्कार करणाऱ्याच्या विरोधात आंदोलन केल. जर हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा द्यावी या सरकारने. महिला जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकाव नाहीतर फाशी द्यावी. अशा शब्दात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्यक्त केला.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, देवेंद्रजींनी (Devendra Fadnavis) माझ्यावर किती आरोप प्रत्यारोप केले, त्यांचा अधिकार आहे. हे लोकशाही आहे. त्यांनी जरूर माझ्यावर टीका करावी. मला चालेल पण मी हात जोडून एक आई म्हणून गृहमंत्र्यांना विनंती करते की... महिलांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही राजाचे गृहमंत्री आहात... संविधानाने आम्हाला आंदोलन करण्यचा अधिकार दिलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलेला असून महिलांविरोधात होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूर येथे झालेली घटना अतिशय संवेदनशील आहे. पण सरकार आणि प्रशासनाकडून ती दुर्दैवीपणे हाताळली गेला. लोक रस्त्यावर उतरल्यावर सरकारला याबाबत जाग आली. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जिजाऊंच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत, अस सुळे म्हणल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.