विक्रम गोखलेंना पिंपरी-चिंचवडमध्ये मिळाला होता आयुष्यातील पहिला पुरस्कार

Vikram Gokhale यांचे उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडशी वेगळे असे अतूट नाते होते.
Vikram Gokhale
Vikram Gokhale Sarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (वय ७७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (दि.२६ नोव्हेंबर) पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे आणि उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडचे वेगळे असे अतूट नाते होते. कारण त्यांच्या आयुष्यातील पहिला पुरस्कार त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वीकारला होता.

उद्योगनगरीतील कलारंग संस्था गेल्या २४ वर्षापासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन गौरव करते. त्यांचा २००४-०५ चा पुरस्कार चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी गोखले यांना देण्यात आला होता. गतवर्षी तो चिन्मय मांडलेकर यांना मिळाला होता. तर, यावर्षीचा हा सोहळा पुढील महिन्यात होणार आहे. कलारंगचा पुरस्कार स्वीकारेपर्यंत गोखले हे इतर कुठलेही पुरस्कार घेत नव्हते. मात्र, तरुणांनी एकत्र येत दिल्याने कलारंगचा पुरस्कार त्यांनी घेतला होता.

Vikram Gokhale
Deepak Kesarkar : उद्धव ठाकरेंच्या टिकेने संयमी केसकरही संतापले...

''पुरस्कार घेत नसल्याने माझ्या आयुष्यातील हा पहिला पुरस्कार आहे'' असे ते त्यावेळी म्हणाले होते. ''तरुण मुले एकत्र येऊन पुरस्कार देत आहेत म्हणून तो अभिमानाने स्वीकारत आहे'', असे मनोगत त्यांनी व्यक्त केले होते. शासनाचे कुठलेही पुरस्कार स्वीकारले नसल्याचे त्यांनी त्यावेळी नमूद केले होते. त्यांना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेला पहिला पुरस्कार हा आमचा असल्याचा अभिमान आहे, असे कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

Vikram Gokhale
Vikram Gokhale : दिग्गज अभिनेत्याच्या जाण्याने राजकीय वर्तुळ हळहळले

या सोहळ्याला उपस्थित ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी, मात्र पुरस्कार घेताना मला, मात्र आनंद होतो, अशी कोपरखळी मारली होती. माणूस म्हणून मोठा असलेला भला माणूस गमावल्याचे मोठे दुख आहे, अशी प्रतिक्रिया गोखलेंच्या निधनावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली. माझ्या वाढदिवशी ते खास मुंबईहून पिंपरी-चिंचवडला आल्याची आठवण त्यांनी सांगितली. मित्रांसाठी सदैव तत्पर असलेले गोखले हे वयाने मोठे असूनही अत्यंत जवळचे मित्र होते, सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे ते अतिशय लाडके होते, असे भोईर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com