Nagar Politics : संगमनेरला चांगल्या बॅट्‌समनची गरज, फिल्डिंगचं माझ्यावर सोडा; विखेंनी पुन्हा थोरातांना डिवचलं

Vikhe Patil Vs Thorat : समोरून कितीही आणि कसेही चेंडू फेकले गेले तरी ते टोलवता आले पाहिजे.
Balasaheb thorat-Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb thorat-Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Nagar News : भाजप नेते आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संगमनेरमध्ये दौरे वाढवले आहेत. संगमनेरमधील घारगावमध्ये नामदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या परितोषिक वितरणाला हजेरी लावत मंत्री विखे यांनी जोरदार भाषण केले. 'संगमनेर तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज आहे. समोरून कसाही चेंडू आला तरी तो टोलवता आला पाहिजे. फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोडा', अशा शब्दांत मंत्री विखे यांनी राजकीय फटकेबाजी केली. (Sangamner needs a good batsman: Radhakrishna Vikhe patil)

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृत्यर्थ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे 21 वे वर्षे आहे. या स्पर्धेत तालुक्यासह पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील संघ सहभागी झाले होते. या नामदार चषक स्पर्धेचे पारितोषिक प्रदान राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे नियोजन आणि प्रतिसाद पाहून मंत्री विखे यांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेत विखे-पाटलांनी केलेले तडाखेबाज भाषण विरोधकांची विकेट घेणारे ठरले. त्यामुळे संगमनेरमध्ये या भाषणाची चर्चा सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Balasaheb thorat-Radhakrishna Vikhe Patil
Solapur Bjp : सोलापूर ‘शहर मध्य’साठी भाजपचा हुकमी हिंदुत्ववादी चेहरा

विखे-पाटील म्हणाले की, स्पर्धा कोणतीही असो, त्यात जिंकण्यासाठी सहभागी होत असताना व्यक्तिमत्त्व विकास घडतो. या स्पर्धेतून चांगले फलंदाज आणि गोलंदाज मिळतील. पण, संगमनेर तालुक्याला चांगल्या फलंदाजाची गरज आहे. समोरून कितीही आणि कसेही चेंडू फेकले गेले तरी ते टोलवता आले पाहिजे. फिल्डिंगचे काम माझ्यावर सोडा. कधी कोणाची दांडी गूल करायची, हे मला माहीत आहे.

'आयपीएल'सारखे संघ बदलू नका !

स्पर्धेचे औचित्य पाहून मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी क्रिकेटच्या भाषेतच राजकीय फलंदाजी करून काही सूचक वक्तव्य केली. त्याला उपस्थितांनीही दाद दिली. विखे यांनी उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांना काही सूचक सल्ले दिले. आता एकच कोणता तरी संघ निश्चित करा, आयपीएलसारखे संघ बदलू नका. आपले भविष्य घडविण्यासाठी निर्णय करण्याची वेळ आली असल्याचा मित्रत्वाचा सल्ला देऊन एकप्रकारे भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रणच दिले.

Balasaheb thorat-Radhakrishna Vikhe Patil
Solapur Politics : सोलापूरचे दोन्ही देशमुख एकत्र आले; पण सुभाषबापूंचा 'तो' उल्लेख विजय देशमुखांना खटकला

मंत्री विखेंचे संगमनेर दौरे वाढले

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे यांचे अलीकडच्या काळात दौरे वाढले आहेत. मंत्री विखे हे थोरातांच्या मैदानात जाऊन त्यांना चिमटे घेत आहेत. निळवंडे धरणाच्या जलपूजनच्या कार्यक्रमात संगमनेर तालुक्यात सर्व काही ठेकेदारांच्या हातात आहे, असे म्हणून टोलेबाजी केली होती. आता पुन्हा संगमनेरला चांगल्या फलंदाजाची गरज आहे, असे सांगून विखेंनी थोरातांना चिमटा घेतला आहे. परंतु थोरातांनी अजून मंत्री विखे यांना प्रत्युत्तर दिलेले नाही. ते संयम राखून आहेत. मंत्री विखे आणि थोरात यांच्यात जेव्हा आरोपांच्या फैरी झडतील, तेव्हा नगर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

Edited By : Vijay Dudhale

Balasaheb thorat-Radhakrishna Vikhe Patil
NCP Crisis : गुगल ट्रेंडमध्येही शरद पवार-अजितदादांमध्ये अटीतटीचा ‘सामना’; राजीनामा सर्वाधिक सर्च

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com