Indapur Bazar Samiti : इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने यांची बिनविरोध निवड

आगामी काळात मागील पाच वर्षांत काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी, संचालक मंडळाला बरोबर घेऊन प्रयत्न करण्यात येतील.
Indapur Bazar Samiti sabhapati-upsabhapati Election
Indapur Bazar Samiti sabhapati-upsabhapati ElectionSarkarnama

इंदापूर (जि. पुणे) : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी विलास सर्जेराव माने, तर उपसभापतीपदी रोहित वसंतराव मोहोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Vilas Mane elected unopposed as Chairman of Indapur Bazar Samiti)

इंदापूर (Indapur) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) पंचवार्षिक निवडणुकीत माजी सभापती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व जागा जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांना आमदार दत्तात्रय भरणे आणि आमदार यशवंत माने यांची मोलाची साथ मिळाली होती.

Indapur Bazar Samiti sabhapati-upsabhapati Election
Katraj Dairy News : केशरताई पवार यांचा पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : अजित पवारांकडे केला सुपुर्त

सभापती-उपसभापती निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (ता.२० मे) सहायक निबंधक जिजाबा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. सभापतीपदासाठी विलास माने, उपसभापती पदासाठी रोहित मोहोळकर यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवडीची घोषणा गावडे यांनी केली.

विलास माने यांनी यापूर्वी इंदापूर बाजार समितीचे सभापती, उपसभापती पदासह संचालकपदही भूषविले आहे. बाजार समितीच्या कामकाजाचा तगडा अनुभव व सर्वांत जेष्ट असल्याने त्यांना पुन्हा एकदा बाजार समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाली आहे. रोहित मोहोळकर एक तरुण, अभ्यासू आणि अनुभवी चेहरा उपसभापतीपदी मिळाला आहे.

Indapur Bazar Samiti sabhapati-upsabhapati Election
'Kerala Story' VS 'Real Kerala Story' ‘केरला स्टोरी’ ला उत्तर देण्यासाठी विजयन सरकारने आणली 'द रियल केरला स्टोरी'

यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने बाजार, समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, संचालक मधुकर भरणे, दत्तात्रय फडतरे, संग्राम निंबाळकर, मनोहर ढुके, संदीप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा, सुभाष दिवसे, यांच्यासह नीरा भिमा कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, राहुल जाधव उपस्थित होते.

बाजार समितीमध्ये मतदारांनी टाकलेल्या विश्वासास पात्र राहून आगामी काळात मागील पाच वर्षांत काही अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी, संचालक मंडळाला बरोबर घेऊन प्रयत्न करण्यात येतील, असे आप्पासाहेब जगदाळे यांनी स्पष्ट केले.

Indapur Bazar Samiti sabhapati-upsabhapati Election
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

मिळालेल्या संधीच्या माध्यमातून बाजार समितीची आर्थिक उलाढाल वाढवण्यावर भर दिला जाईल. आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालकांना विश्वासात घेऊन शेतकरीहिताचे निर्णय घेत पारदर्शक कारभार केला जाईल, अशी ग्वाही नूतन सभापती विलास माने आणि उपसभापती रोहित मोहोळकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com