फडणवीसांचे पाठबळ मिळताच वाबळेवाडी शाळेसाठी पुन्हा दीड लाखाची लोकवर्गणी

पालक लोकवर्गणीच्या निमित्ताने ज्या वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेची चौकशी सुरू करून पुणे जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे वर्षभरापूर्वी निलंबन केले होते.
Wablewadi school
Wablewadi schoolSarkarnama
Published on
Updated on

शिक्रापूर (जि. पुणे) : पालक लोकवर्गणीच्या निमित्ताने शिरूर (shirur) तालुक्यातील ज्या वाबळेवाडी आंतरराष्ट्रीय शाळेची (Wablewadi School) चौकशी सुरू करून पुणे जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे वर्षभरापूर्वी निलंबन केले होते. त्याच वाबळेवाडीकरांनी आता उघडपणे १ लाख ३९ हजारांची लोकवर्गणी शाळेच्या प्रांगणात संकलीत केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दहा दिवसांपूर्वी शिक्रापूरमध्ये ग्रामस्थांना न्याय देण्याची ग्वाही दिली, त्यानंतर ग्रामस्थांनी पुन्हा लोकवर्गणी काढण्याचे धाडस दाखवले. वाबळेवाडीकर लवकरच मुंबईला फडणवीस यांना भेटायला जाणार आहेत, असे ग्रामस्थांच्या वतीने केशवराव वाबळे व सतीश वाबळे यांनी सांगितले. (Villagers collected another one and a half lakh rupees for the Wablewadi school)

वाबळेवाडी शाळेत १७ जुलै २०२१ रोजी पासून बेकायदेशीर लोकवर्गणीचे प्रकरण चर्चेत आले. तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी झोकून देऊन संपूर्ण शाळा देश-विदेशात चर्चेत आणूनही त्यांचीच चौकशी सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेतील ज्या तीन जिल्हा परिषद सदस्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या चौकशीचा आग्रह धरला होता. त्यातील एकही अधिकारी-पदाधिकारी वाबळेवाडी शाळेत अद्यापर्यंत एकदाही येऊन ग्रामस्थांना भेटू शकलेले नाहीत.

Wablewadi school
शिवसेनेच्या 'त्या' निर्णयामुळे महाआघाडीच्या नेत्यांमध्ये धाकधूक!

वारे गुरुजींची चौकशी, राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि राज्याच्या राजकारणापर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटत असताना शाळेतील पटही कमी झाला आणि अनेक उपक्रम बंदही पडले. मात्र, ग्रामस्थांची चिकाटी काही कमी झाली नाही. सरकार बदलताच आणि दहा दिवसांपूर्वी शिक्रापुरात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या शाळेबाबत थेट मुंबईला भेटायला या म्हणताच ग्रामस्थ पुन्हा सरसावले. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनी त्यांनी पुन्हा एकदा नव्या दुमजली आठ वर्गखोल्यांच्या रंगकामासाठी लोकवर्गणी काढण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्याच आवाहनात तब्बल १ लाख ३९ हजारांची लोकवर्गणी गोळा झाली.

Wablewadi school
काय ते डोंगर...काय ती हिरवळ... : शहाजीबापूनंतर वळसे पाटलांचीही डायलॉगबाजी!

ग्रामस्थांच्या वतीने सुदेश वाबळे आणि अतुल वाबळे यांनी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीचा धनादेश उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी यांच्याकडे सुपूर्त केला. या वेळी सर्व शिक्षकांसह ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी सरपंच केशवराव वाबळे, भगवानराव वाबळे, दिलीप वाबळे, बापूसाहेब वाबळे, सुरेखा वाबळे, तुकाराम वाबळे, अंकुश वाबळे, सतीश कोठावळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश वाबळे यांनी केले.

Wablewadi school
...तेव्हा फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर ‘करुणा’ दाखवली; मुख्यमंत्र्यांचा टोला!

शिक्षकांनीही दिली वर्गणी

शाळेत एकुण १३ शिक्षक असून त्यातील प्रत्येकाने प्रत्येकी पाच हजार रुपये शाळेसाठी देणगी दिली आहे. गेले वर्षभर बेकायदा लोकवर्गणीस विरोध झाला तरीही ग्रामस्थांबरोबरच आता शिक्षकांनीही शाळेसाठी वर्गणी दिली आहे. म्हणजे लोकवर्गणीच्या नावाखाली शाळेला विरोध करणाऱ्यांना ही चपराक आहे.

Wablewadi school
हर्षवर्धन पाटलांशी संबंधित कारखान्याची शेतकऱ्याकडून एफआरपीसाठी तोडफोड

जिल्हा परिषद आणि सीईओंच्या भूमिकेकडे लक्ष

लोकवर्गणीच्या विषयावर पुणे जिल्हा परिषदेने थेट मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती यांची चौकशी करुन मुख्याध्यापक वारे यांचे तात्काळ निलंबन केले होते. पुढे वारे खेड तालुक्यात रुजू झाले. मात्र, अद्यापपर्यंत वारे यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. ग्रामस्थांनीही आता १ लाख ३९ हजारांची लोकवर्गणी गोळा केल्याने पुणे जिल्हा परिषद काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com