MLA Dattatraya Bharne : ...अन् गावकऱ्यांनी आमदार भरणेंची थेट हत्तीवरूनच मिरवणूक काढली!

Dattatray Bharne's procession on an elephant : गोड बोलून पाठीवरती थाप मारणारी खरी-खोटी माणसं ओळखायला शिका, असे आवाहनही भरणे यांनी जनतेला केले आहे.
MLA Dattatraya Bharne
MLA Dattatraya BharneSarkarnama
Published on
Updated on

Indapur Political News : तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते येऊन जाती-जातीमध्ये भेदभाव करून गैरसमज पसरविण्याचे काम करीत असतात. युवकांनी तसेच जनतेने गोड बोलून पाठीवरती थाप मारणारी खरी व खोट्या माणसांना ओळखायला शिकण्याचे आवाहन इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील कळंब येथे 102.70 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटन व भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी दत्तात्रय भरणे म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. माझ्यावरती सातत्याने खोटे आरोप होत असतात. मला कोणावरती टीका-टिप्पणी करायची नाही. मी रुबाब करण्यासाठी मंत्री झालो नाही. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. मला खोटे-नाटे, शोबाजी आवडत नाही. युवकांनी खरे-खोटे बोलणारी माणसे ओळखावीत. किती दिवस खोटं बोलणाऱ्या लाेकांना साथ देणार आहात?

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Dattatraya Bharne
Amol Kolhe News : 'वेट अँड वॉच' म्हणत लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबत कोल्हेंचे संकेत

याशिवाय, जनतेने आपले पूर्वीचे गाव व आत्ताचे गाव यामध्ये झालेला फरक लक्षात घ्यावा. आपल्या गावचा विकास कोण करीत आहे. गावातील रस्ते कोणी केले, पाणी कुणी आणले, याचा विचार करावा. आज इंदापूर शहरासह तालुका झपाट्याने बदलत आहे. तालुक्यामध्ये पर्यटन वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे सांगून लोकसभा निवडणुकीच्या वेळी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांच्या(Ajit Pawar) पाठीशी खंबीरपणे उभा राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार दत्तात्रय भरणे(Dattatraya Bharne) यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील कळंब गावाच्या विकासासाठी 102.70 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, कामे सुरू आहेत. विकासनिधीमुळे गावकरी खूष झाले असून, गावकऱ्यांनी चक्क आमदार दत्तात्रय भरणे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, संचालक बाळासाहेब पाटील, अभिजित रणवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रेय फडतरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, वीरसिंह रणसिंग, ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र कदम, उपाध्यक्ष मधुकर पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास डोंबाळे, कळंबच्या सरपंच विद्या अतुल सावंत, महिला अध्यक्षा साधना केकान, युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर उपस्थित होते.

MLA Dattatraya Bharne
Shivtare's Big Announcement : विजय शिवतारेंनी दंड थोपटले; ‘बारामतीतून अपक्ष लोकसभा लढवणार...'

शेतीच्या पाण्याचे प्रश्‍न मार्गी लावणार...-

या वेळी भरणे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रुबाब हा सध्या नीरा -देवघर धरणातील पाण्यावरती सुरू आहे. नीरा-देवघरचे काम सुरू झाल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये जानेवारी -फेब्रुवारीनंतर एक थेंबही पाणी मिळणार नाही. मात्र, तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी काम सुरू आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com