Pune Political News : शिवसेना उपनेते विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मी महायुतीच्या विरोधात नाही, मी आमच्या नेत्यांच्या विरोधात नाही. वेळप्रसंगी मी अपक्ष म्हणून अथवा नरेंद्र मोदी विचार मंचच्या माध्यमातून निवडणूक लढवेन. पण, बरामतीतून लोकसभेची निवडणूक लढवणारच, असा निर्धार शिवतारे यांनी बोलून दाखवला.
विजय शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला अपमान केला आहे. सहा सहा पक्ष एकत्र करून कटकारस्थानं केली आहेत. अजित पवार हे अशा प्रकारे पुरंदरच्या जनतेशी वागले आहेत. आम्ही त्यांना मतदान कसे करणार. महायुती असो की काही असो. त्यामुळे अजित पवार यांना मतदान न करण्याच्या मानसिकतेत अनेक लोक आहेत. अजित पवार यांनी नालायकपणाचा कळस गाठला होता. पण, नियती त्यांना धडा शिकवेल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत (Baramati Lok Sabha Constituency) वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल. मला माहिती नाही. पण, मी बारामतीतून अपक्ष उभा राहणार आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) विचार मंच लिहिणार किंवा काही लिहिलं, पण मी महायुतीच्या विरोधात नाही, आमच्या नेत्यांच्या विरोधात नाही.
आमचा विरोध फक्त पवारांना आहे. त्या विरोधासाठी लोकांना संधी, तर मिळायला पाहिजे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या गाड्या फिरत आहेत, पण दुसऱ्या बाजूचा विचारच होत नाही. ही पोकळी भरून काढण्याचे काम मी करणार आहे, असेही शिवतारे यांनी नमूद केले.
शिवतारे म्हणाले, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पंधरा वर्षांत मतदारसंघासाठी काहीही काम केले नाही. संसदेत भाषणं करून विकास होत नाही, हे त्यांच्या बंधूंनीच (अजित पवार) सांगितले आहे. केंद्र सरकारचे प्रकल्प त्यांनी मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागात आणायला पाहिजे हेाते.
पण, सगळे प्रकल्प बारामतीत नेण्यात आले. बारामतीतून निवडून येऊन त्यांनी ब्लॅकमेलिंग करण्याचे प्रकार केले आहेत. हे पाप बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांचं आहे आणि त्याचे परिमार्जनही आम्हालाच करावे लागणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.