Amol Kolhe News : 'वेट अँड वॉच' म्हणत लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबत कोल्हेंचे संकेत

Nilesh Lanke news : लंकेंना शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देणारे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत खुलासा केला आहे.
Amol Kolhe
Amol Kolhe Sarkarnama

Pune Loksabha Election 2024 News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर लंके यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत आता लंकेंना शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देणारे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत खुलासा केला आहे.

पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानने लोकसभा निवडणुकीच्या Loksabha Election 2024 पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये घेतला. या महानाट्यातील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे MP Amol Kolhe यांनी ते सादर केले. या महानाट्याला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानाट्याच्या समारोपादिवशी खासदार कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या Maharashtra स्वाभिमानाची 'तुतारी' नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amol Kolhe
Pune News : नीलेश लंके आणि अमोल कोल्हेंमध्ये पक्ष प्रवेशाच्या चर्चा.. ?

हे निमंत्रण मिळाल्यानंतरच्या काळामध्ये नीलेश लंके यांनीदेखील मनावरती घेतल्याचे पाहायला मिळालं. यानंतर नीलेश लंके यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच नीलेश लंके यांचा पक्ष प्रवेश होईल, असं बोललं जात होतं. मात्र, पक्षप्रवेशाबाबतच्या काही वाटाघाटी अद्यापही बाकी असल्याने हा पक्ष प्रवेश झाला नसल्याच्या चर्चा आहेत. नीलेश लंके यांना मोठा कार्यकर्ता मेळावा घेऊन पक्ष प्रवेश करायचा असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर पक्ष प्रवेश होणार असल्याच्या चर्चा आहेत.

मात्र, आज नीलेश लंके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर साधारण अकराच्या सुमारास लंके यांनी खासदार अमोल कोल्हे यांचीदेखील भेट घेतल्याचे समोर आलं आहे. शरद पवार यांच्या सोबत झालेल्या भेटीमधला तपशील नीलेश लंके यांनी कोल्हे यांना सांगितल्याचं बोललं जात आहे.

नीलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचं काय झालं आणि शरद पवार यांची भेट नीलेश लंके Nilesh Lanke यांनी का घेतली. याबाबत प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, नीलेश लंके हे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. लंके हे जनतेशी नाळ जोडलेले नेते आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना कळतं त्याप्रमाणे ते निर्णय घेतील. मात्र, आज आमच्या दोघांमध्ये जी भेट झाली ती त्यांच्या मतदारसंघांमध्ये ज्या महानाट्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याबाबतचे आभार मानण्यासाठीची ही भेट होती. त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत जस्ट वेट अँड वॉच लवकरच तुम्हाला कळेल, असा सूचक इशारा अमोल कोल्हे यांनी नीलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत दिला.

भाजपच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची भावना असून, अनेक गोष्टी गुलदस्तात आहेत. लंके यांना ज्याप्रकारे पुन्हा येण्याचे आव्हान केलं त्या पद्धतीचा आपण बाकी आमदारांना करू असं वाटत नाही. परंतु प्रत्येक आमदारांनी विचार केला पाहिजे, असं कोल्हे म्हणाले.

Edited By : Rashmi Mane

R

Amol Kolhe
Lok Sabha Election 2024 : 'हा' विधानसभा मतदारसंघ शिरूरचा बालेकिल्ला, मजबुतीसाठी कोल्हेंची 'इंडिया' आघाडीला हाक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com