
Pune News, 06 Feb : बीडमधील एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सतीश भोसले (Satish Bhosale) नावाचा व्यक्ती एका तरुणाला अमानुष मारहाण करताना पाहायला मिळत आहे. तर व्हायरल व्हिडिओत मारहाण करणारा सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे.
तसेच भोकरधनमध्ये देखील एका व्यक्तीला तापलेल्या सळईच्या माध्यमातून मारहाण झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या दोन्ही प्रकरणाच्या अनुषंगाने ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी आमदार सुरेश धसांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भोकरधन प्रकरणावर बोलताना हाके (Laxman Hake) म्हणाले, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचा भक्त असलेल्या आणि शिक्षण कमी असलेल्या शेतकरी कुटुंबातील कैलास मोराळेला लोखंडी रॉड लाल बुंद करून त्याच्या हाता पायाला चटके दिले, त्याच्या गुप्तांगांमध्ये सळई खुपसन, तसेच पूर्ण शरीरावरती चटके दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील आणवा गावात घडली.
ही घटना घडत असताना त्याच्या बाजूला काही लोक दर्शक म्हणून पाहत होते. तसंच काही व्हिडिओ बनवत होते. ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाबाबत मी खोलवर जाऊन माहिती घेतली. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मात्र या आरोपीवर वरदहस्त असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा (Shivsena UBT) तालुकाप्रमुख नवनाथ दौंड पाटील याच्यावर देखील कारवाई होणे आवश्यक आहे. दौंड याचे फोटो सातत्याने मराठा आंदोलन जरांगे पाटील यांच्यासोबत पाहायला मिळाले असून दौंड हा जरांगेंचा राईट हॅन्ड असल्याचा देखील आरोप हाकेंनी यावेळी केला.
सतीश भोसले प्रकरणावर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, "खोक्या भोसले हा सुरेश धसांचा एकदम खास कार्यकर्ता असून तो धसांच्या पहिल्या पाच कार्यकर्त्यांमध्ये येतो. सुरेश धस निवडणुकीला उभे असताना दीडशे गाड्यांचा ताफा घेऊन हा भोसले येत असत. त्याच्या रील आणि त्याच वागणं त्यामुळे त्याचं नाव सतीश भोसले असताना देखील त्याला खोक्या भोसले म्हणून ओळखलं जातं.
सुरेश धसांनी महाराष्ट्राला आका हा शब्द दिला. आरोपी आणि त्या आरोपीचा नेता म्हणून सुरेश धस (Suresh Dhas) जर नेत्यांचे राजीनामे घेण्यात यशस्वी झाले असतील तर आता सुरेश धस यांनी आका शब्द आपल्याला लावून घ्यावा आणि या खोक्या भोसलेचा आका नेमका कोण आहे. हे सुरेश धसांनी एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगाव अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.