Pune Politics : शरद पवार की अजित पवार, कोणासोबत जायचं? राष्ट्रवादीच्या नेत्याने सरळ निवृत्तीच घेतली; अख्खा वॉर्ड भाजपच्या झोळीत

Vishal Tambe NCPSP PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीच्या तयारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण पुण्यातील मोठ्या नेत्याने राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.
Vishal Tambe after announcing his political retirement amid PMC election preparations.
Vishal Tambe after announcing his political retirement amid PMC election preparations. sarkarnama
Published on
Updated on

Vishal Tambe News : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा झटका बसला आहे. धनकवडी भागातून 2007 पासून पुणे महापालिकेत नगरसेवक असलेले, तसेच स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विशाल तांबे हे शरद पवारांच्यासोबत राहिले होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी नाही, अशी भूमिका मांडली होती. त्याला विशाल तांबेंनी विरोध करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची भूमिका मांडली होती. त्यामुळे दादा आणि साहेबांचे पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तांबेंनी ऐनवेळी निवडणुकीतून घेतलेली माघार अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे.

दरम्यान, आपल्या राजकीय निवृत्ती विषयी तांबे यांनी धनकवडी परिसरात पत्रके वाटून माहिती दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, 'माझं एक साधं तत्त्व आहे, पद-प्रतिष्ठा-गौरव याहून मोलाचं असतं, ते म्हणजे माणुसकी अन् आपली मर्यादा. सध्याच्या राजकारणाचं बदलतं स्वरूप आणि आपली स्वतःकडून वाढणारी आगळीक अपेक्षा याला कुठेतरी आपणहूनच मर्यादा घालायला हवी, हे मी ठरवलं आहे.'

Vishal Tambe after announcing his political retirement amid PMC election preparations.
Atul Save On Congress: दहा वर्षापुर्वीचा फॉर्म्युला आता चालणार नाही; भाजपनं शिवसेनेला ठणकावलं!

पुढे त्यांनी म्हटले आहे की, आता स्वतःहून कुठंतरी थांबलं पाहिजे, आजपर्यंत आपल्याला मिळालेल्या सेवेच्या संधीबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, या मताचा मी आहे. हा क्षण माझ्यासाठी समाधानाचा क्षण आहे. कधीकधी समाधान निवडलेलं बरं असतं. कारण, खूप जास्त अपेक्षा असल्या की त्याला स्वार्थाचा, अमर्याद प्रसिद्धीचा आणि अवगुणांचा सहवास जडतो आणि माणूस माणूसपण विसरून जातो.

समाजकारण सुरूच राहणार...

राजकारणातून बाजूला होऊन राजकीय प्रवास थांबवत असलो, तरी समाजकारण आणि निस्वार्थ सेवा ही अशीच पुढे चालू राहील, हा माझा शब्द आहे. कारण, हा माझा पिंड आहे. हीच माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे, शिक्षण, सहकार अशा क्षेत्रांतील माझ्या कुटुंबाचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे देखी तांबे यांनी म्हटले आहे.

किशोर धनकवडे भाजपात...

मागील निवडणुकीच्या वेळी धनकवडीमधून विशाल तांबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे किशोर धनकवडे, अश्विनी भागवत विजयी झाल्या होत्या. वर्षा तापकीर या एकमेव भाजप उमेदवार या वाॅर्डमधून विजयी झाल्या होत्या. मात्र, विशाल तांबे यांची राजकीय निवृत्तीनंतर किशोर धनकवडे हे भाजपमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तांबेंच्या निवृत्तीने भाजपचा मार्ग मोकळा झाला असून अख्या वाॅर्ड भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Vishal Tambe after announcing his political retirement amid PMC election preparations.
Pune BJP Candidate List : भाजप उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, 'या' तारखेला होणार जाहीर; शिवसेनेला 30 जागा सोडणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com