Pune BJP Candidate List : भाजप उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, 'या' तारखेला होणार जाहीर; शिवसेनेला 30 जागा सोडणार?

Pune BJP PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आपली पहिली उमेदवार यादी जाहीर करणार आहे. शिवसेनेला 30 जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवल्याची माहिती आहे.
pune bjp Candidate List Update
pune bjp Candidate List UpdateSarkarnama
Published on
Updated on

BJP Candidate List Update : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने आपली उमेदवारी यादी जाहीर करण्याचा मुहूर्त निश्चित केल्याची माहिती आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून 35 ते 40 जागांचा आग्रह धरला जातो आहे. तर, भाजपने 25 ते 30 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे.

आज दोन्ही पक्षाची बैठक होणार असून जागा वाटपाचे सुत्र निश्चित होणार आहे. दरम्यान, जागा वाटपाबाबत निर्णय झाल्यानंतर 22 डिसेंबरला भाजप आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर बंडखोरी रोखण्यासाठी केवळ एक दिवस आधी उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची आज बैठक होणार असून या बैठकीला गणेश बिडकर, धीरज घाटे,नाना भानगिरे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे.

pune bjp Candidate List Update
Ichalkaranji Politics : इचलकरंजीत भाजप-राष्ट्रवादीचं जमेना, काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यास विरोध आहे. तर, इतर पक्ष मात्र भाजप विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली पाहिजे, अशी भूमिका मांडत आहेत.

pune bjp Candidate List Update
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत आघाडीचा 'टांगा पलटला' आता महापालिकेत 'घोडेही' फरार होणार; एकनाथ शिंदेंचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com