Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

NCP Ajit Pawar Group News : राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीही महायुतीत सहभागी झाली. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेतीलही समीकरणही बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक हे मुश्रीफ यांच्या सोबत राहिले. मात्र, शहरातील काही नगरसेवकांनी मुश्रीफांच्या या भूमिकेबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.
Rajesh Latkar-Hasan Mushrif
Rajesh Latkar-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 08 April : कोल्हापूर शहरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना जोरदार धक्का बसला आहे. कोल्हापूर महापालिकेत मुश्रीफांचा गड सांभाळणारे स्थायी समितीचे माजी सभापती आणि माजी महापौर ॲड. सूरमंजिरी लाटकर यांचे पती राजेश लाटकर यांनी आपली विचारधारा जपत स्वतंत्र निर्णय घेतला आहे. कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे जवळपास सर्वच नगरसेवकांनी मुश्रीफ यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असताना राजेश लाटकर यांनी कोल्हापूरच्या पुरोगामी विचारधारेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुश्रीफांसोबत खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार देत त्यांनी काँग्रेससोबत राहणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेत गेल्यात दोन ते तीन वर्षांपासून प्रशासक राज आहे. महापालिकेत राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र होती, त्यावेळी म्हणजे 2015 ते 2020 या कार्यकाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचे 44, भाजप-ताराराणी आघाडीचे 33 तर शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. शिवसेनेचे चारही नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajesh Latkar-Hasan Mushrif
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेची बालेकिल्ल्यातच दमछाक, मराठवाड्यात शिंदे गटाला फक्त...

राज्यातील सत्ता बदलानंतर राष्ट्रवादीही महायुतीत सहभागी झाली. त्यानंतर कोल्हापूर महापालिकेतील समीकरणही बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्व नगरसेवक हे मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या सोबत राहिले. मात्र, शहरातील काही नगरसेवकांनी मुश्रीफांच्या या भूमिकेबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर (Rajesh Latkar) यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर नाराजी व्यक्त करत आपण महायुतीचा प्रचार करणार नसल्याचे सांगितले. आपण काँग्रेस सोबत राहणार असल्याची भूमिका स्पष्ट करत त्यांनी खासदार संजय मंडलिक यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून आपण भाजपच्या भूमिकेबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आलो आहोत. आता त्यांचा प्रचार आपण करणार नाही, अशी ठाम भूमिका राजेश लाटकर यांनी मांडली आहे.

Rajesh Latkar-Hasan Mushrif
Jayant Patil News : जयंत पाटलांनी मुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांना डिवचलं; म्हणाले, "तिथे हात जोडून..."

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत प्रकाश गवंडी, रमेश पुरेकर, आदिल फरास, उत्तम कोराणे, संदीप कवाळे, रेखा आवळे, रमेश पोवार, सतीश लोळगे, सुनील पाटील, परिक्षित पन्हाळकर, महेश सावंत आदी नगरसेवक आहेत. काँग्रेसकडून सचिन चव्हाण, सागर चव्हाण, संजय मोहिते, शारंगधर देशमुख्, मधुकर रामाणे, राजाराम गायकवाड, अर्जुन माने, ईश्वर परमार, सुभाष बुचडे, मोहन साले, विक्रम जरग, दुर्वास कदम, दीपा मगदूम, अनिल कदम, महेश जाधव, रियाज सुभेदार आदी माजी नगरसेवक काँग्रेस उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारात उतरले आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आर. के, पोवार यांनी तर शहराची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजप-ताराराणी आघाडीचे प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, सुनील कदम, विजय सूर्यवंशी, मुरलीधर जाधव, दीपक जाधव, अजित ठाणेकर, विजय खाड़े पाटील, किरण नकाते, सुभाष दामुगडे, अशिष ढवळे, रूपाराणी निकम, चंद्रकांत घाटगे यांनी शिवसेना उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारात भाग घेतला आहे.

Edited By : Vijay Dudhale

R

Rajesh Latkar-Hasan Mushrif
MLA Raju Patil News : विधानसभेची आठवण सांगत राजू पाटलांनी 'आपण नेहमीच तयार असतो' म्हटल्याने, चर्चांना उधाण!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com