Walmik Karad Property: कराडला 24 तासांत सलग चौथा मोठा धक्का; PCMC नं कोट्यवधींची प्राॅपर्टी केली 'सील'; 'हे' आहे कारण

Pimpri Chinchwad Mahapalika Action On Walmik Karad Property : एसआयटी व सीआयडीकडून एकामागोमाग एक अशा कारवाईचे झटके वाल्मिक कराडला दिले जात आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीत वातावरण तापलं आहे. एकीकडे त्यांच्या समर्थकांकडून आंदोलनाद्वारे तपासयंत्रणावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे कराडभोवतीचा कारवाईचा फास आवळण्यात येत आहे.
Walmik Karad aND pcmc .jpg
Walmik Karad aND pcmc .jpgSarkarnama
Published on
Updated on

Beed News: आधी 2 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीनं अटक केल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणीही वाल्मिक कराड (Walmik Karad) एसआयटीच्या रडारवर आला आहे. त्याला एकापाठोपाठ एक कारवाईचे धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. मागील 24 तासांत कराडला चौथा जबर धक्का बसला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडवर मकोका कारवाई करत कराडला पहिला आणि सर्वात मोठा धक्का देण्यात आला होता. यानंतर त्याने गेल्याच महिन्यात केजमध्ये वाईन शॉप सुरू करण्यासाठी मिळवलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं.

त्यानंतर बुधवारी (ता.15)दुपारी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.या तिसर्‍या धक्क्यानंतर आता कराडला पिंपरी चिंचवड महापालिकेनं (PCMC) चौथा धक्का दिला आहे.त्याचा उच्चभ्रू सोसायटीत असणार्‍या कोट्यवधींच्या आलिशान फ्लॅटला लवकरच टाळं ठोकण्यात येणार आहे.

Walmik Karad aND pcmc .jpg
Walmik Karad MCOCA : संतोष देशमुख हत्येच्या कटात वाल्मिक कराडभोवती फास घट्ट; उद्या पुन्हा न्यायालयात...

एसआयटी व सीआयडीकडून एकामागोमाग एक अशा कारवाईचे झटके वाल्मिक कराडला दिले जात आहे. मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर परळीत वातावरण तापलं आहे. कराड समर्थकांनी ठिय्या आंदोलन,घोषणाबाजी,टायर पेटवून या कारवाईविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. एकीकडे या आंदोलनाद्वारे तपासयंत्रणावर दबाव टाकल्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे कराडभोवतीचा कारवाईचा फास आवळण्यात येत आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत आलिशान फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत काही कोटीमध्ये असल्याचेही बोलले जात आहे. मात्र,कराडच्या याच फ्लॅटचा ताबा पिंपरी चिंचवड महापालिकेनं घेतला आहे लवकरच त्याचा लिलाव होण्याची शक्यता आहे. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी ही कारवाई महापालिका करण्याची शक्यता आहे.तसं जर झालं तर कराडला हा चौथा धक्का असणार आहे.

Walmik Karad aND pcmc .jpg
Election Commission Notice : ...म्हणून निवडणूक आयोगाने भाजप अन् काँग्रेस अध्यक्षांना पाठवली नोटीस !

पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत वाल्मिक कराडची स्थावर मालमत्ता आढळून आली. यातील एक संपत्ती फर्ग्युसन रस्त्यावर आणि दुसरी वाकड येथे आहे.पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेल्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराड आणि त्याची पत्नी मंजली यांच्या नावे मालमत्ता आहे. तिथे 4BHK फ्लॅटची मिळकत असून आता प्रशासनाने ती सील केली आहे. तर ही कारवाई कर न भरल्यामुळे पिंपरी चिंचवडच्या महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडनं गेल्याच महिन्यात केजमध्ये वाईन शॉप सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. त्याला केज नगरपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्रही मिळवलं होतं. पण खंडणी आणि आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या कराडला नगर पंचायतीनं मोठा धक्का देत या वाईन शॉपचं परवानगी रद्द केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com