Walmik Karad : "2 कोटींची खंडणी मागितल्याचा उल्लेख..."; न्यायालयात वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला 'हा' मोठा युक्तिवाद

CID custody to Walmik Karad : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात असलेला आणि हत्येशी संबधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली.
Walmik Karad
Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Dec : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला जात असलेला आणि हत्येशी संबधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. त्यानंतर रात्री 9.30 वाजता केज येथे त्याला आणण्यात आले.

न्यायालयासमोर त्याला हजर केल्यानंतर न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला (Walmik Karad) 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्यानंतर रात्री बारा नंतर वाल्मिक कराडला बीडकडे रवाना करण्यात आलं. तर न्यायालयात वाल्मिक कराडला हजर केलं असता त्याच्या वकीलांनी त्याची बाजू मांडली.

यावेळी वकिलांनी ही तक्रार खंडणीची आहे. मात्र, यात कुठेही दोन कोटींची खंडणी मागितल्याचा उल्लेख नसल्याचं सांगितलं. तसंच विष्णू चाटे याचा मोबाईल नाशिकमध्ये सापडला पण तो कराडच्या ऑफिसमध्ये आल्याचं सांगितलं जात आहे पण कधी बोलावलं हे स्पष्ट नाही. आम्हाला राजकीय बळी ठरवलं जात आहे.

वाल्मिक कराडवरील 15 गुन्ह्यांपैकी फक्त एक गुन्हा तोही आंदोलनचा आहे. त्यामुळे 15 दिवसांच्या पोलिस (Police) कोठडीची गरज नाही. राजकीय दबावातून गुन्हा दाखल केला असून आरोपी स्वत: हजर झाल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला.

दरम्यान, वाल्मिक कराडच्या वकिलाच्या युक्तीवादानंतर सरकारी वकिलांनी देखील आम्हाला न्यायालयीन कोठडी का पाहिजे याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अनुषंगाने हत्या आणि अॅट्रोसिटीचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तपास करण्यासाठी आम्हाला कोठडी पाहिजे असल्याचं सांगितलं.

Walmik Karad
Prakash Ambedkar : वाल्मिक कराड प्रकरणी सरकारवर दबाव पण..., प्रकाश आंबेडकरांनी CM फडणवीसांना केलं 'हे' मोठं आवाहन

वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वीच्या घडामोडी

वाल्मिक कराड पुण्यात (Pune) सरेंडर करणार असल्याच्या 2 दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. त्यानंतर मंगळवारी (ता.31) सकाळी 7 वाजता पुण्यातील सीआयडी ऑफिस बाहेर कराड याचे कार्यकर्ते एकत्रित जमायला सुरूवात झाली. त्यानंतर 9 वाजता CID ऑफिस बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला.

Walmik Karad
Vasant More : इथे सापडला की ठोकला! वाल्मिक कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर वसंत मोरेंनी साधला निशाणा

दहा नंतर उपायुक्त संदीप गिल आणि गुन्हे शाखेचे उपयुक्त निखिल पिंगळे हे सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी दाखल तिथे दाखल झाले. तर दुपारी 12 मी सीआयडीकडे सरेंडर करणार असल्याचं स्वतः वाल्मिक कराड याने व्हिडिओद्वारे सांगितलं आणि त्यानंतर स्कॉर्पिओतून चेहरा लपवत वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com