Vasant More : इथे सापडला की ठोकला! वाल्मिक कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर वसंत मोरेंनी साधला निशाणा

Vasant More On Walmik Karad : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अशातच ,संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि 2 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी आणि पोलिसांना शरण आला आहे.
Vasant More | Walmik Karad
Vasant More | Walmik KaradSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 01 Jan : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अशातच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आणि 2 कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी सीआयडी आणि पोलिसांना शरण आला आहे.

वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या शरण प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी कालच्या घटनाक्रमावर सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराड याचा संबंध असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. वाल्मिक कराड याचे असलेल्या राजकीय संबंधांमुळे त्याला अटक केली जात नसल्याची टीका राजकीय वर्तुळातुन होत असतानाच वाल्मिक कराड हा मंगळवारी सीआयडीला शरण आला.

मात्र, शरण येण्यापूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडल्या सुरुवातीला सकाळी बीडमधून वाल्मिक कराडचे अनेक कार्यकर्ते पुण्यातील सीआयडी मुख्यालय बाहेर पोहोचले होते. त्यानंतर माध्यमांना वाल्मिक कराड शरण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर माध्यमांचा गराडा देखील मुख्यालय बाहेर जमला.

Vasant More | Walmik Karad
Walmik Karad Hearing : केज कोर्टातील 'या' मोठ्या ट्विस्टनंतर अखेर वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलिस कोठडी

यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त त्या ठिकाणी लावला. मात्र साडे अकरानंतर वाल्मिक कराड येण्याची शक्यता कमी झाल्याने बंदोबस्त देखील कमी करण्यात आला आणि कार्यकर्ते देखील पांगले आणि अचानक एका पांढऱ्या स्कॉर्पिओमधून साडेबाराच्या सुमारास वाल्मिक कराड सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला.

Vasant More | Walmik Karad
Prakash Ambedkar : वाल्मिक कराड प्रकरणी सरकारवर दबाव पण..., प्रकाश आंबेडकरांनी CM फडणवीसांना केलं 'हे' मोठं आवाहन

दरम्यान, त्यावेळी देखील काही कार्यकर्ते हे सीआयडी ऑफिसच्या बाजूला उपस्थित होते. त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. याबाबतच्या व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत वसंत मोरे यांनी वाल्मीक कराड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर निशाणा साधला आहे. या सोशल मीडिया पोस्ट मध्ये वसंत मोरे म्हणाले, "वाल्मिक कराड आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवावं ही तुमच्या बीडची मीडिया नाही हे आमचे अस्सल पुणेकर मीडियावाले आहेत, इथे सापडला की ठोकला", अस वसंत मोरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com