Ashadhi Ekadashi Darshan : वारकऱ्यांसाठी मोठी बातमी ! मुख्यमंत्र्यांची महापुजा सुरू असतानाही 'आषाढी'ला दर्शन घेता येणार

Radhakrishn Vikhe Patil News : एकादशीदिवशी व्हीआयपी दर्शन बंद
Pandharpur Temple
Pandharpur TempleSarkarnama
Published on
Updated on

State Government On Ashadhi Darshan : आषाढी एकादशीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वारकऱ्यांसह सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजा सुरू असताना यापूर्वी मंदिर नागरिकांसाठी बंद असायचे. यावर्षीपासून मात्र वारकऱ्यांना मुखदर्शन घेता येणार आहे. (Latest Marathi News)

Pandharpur Temple
Pankaja Munde News : मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत बीआरएस, एमआयएमने पंकजा मुंडेची डोकेदुखी वाढवली..

या निर्णयाबाबत सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (ता. २४) माहिती दिली. ते बारामती येथे बोलत होते. विखे पाटील म्हणाले, याबाबत शुक्रवारी (ता. २३) रात्री बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येते. ही पुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होते. ही पूजा पहाटे अडीच वाजता सुरू होऊन ती पहाटे पाचपर्यंत सुरू असते.

या काळात वारकऱ्यांना दर्शनासाठी बंद असते. यावर्षी मात्र आषाढी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच महापुजेदरम्यान मुखदर्शन घेता येणार आहे. ही व्यवस्था केल्याने लाखो भाविकांचा त्रास कमी होणार आहे.

Pandharpur Temple
Vikhe Patil News: गणेश कारखाना नव्या संचालक मंडळानेच चालवावा; सभासदांचा कौल विखे पाटलांनी केला मान्य

विखे पाटील म्हणाले, आषाढी एकदशीच्या दर्शनबाबत दोन निर्णय घेतले आहेत. २००९ मध्ये आपण मुखदर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय आता आमलात आणला आहे.'व्हीआयपी'मुळे गाभाऱ्यात गर्दी होते. त्यांना बाहेरच्या बाजूला बसण्यासाठी जागा आहे तेथे 'एलईडी' लावली आहे. तेथे महापुजा पाहता येणार आहे. दरम्यान मुख्यमंत्र्याबरोबर असणाऱ्या 'व्हीआयपी' लोक त्या दिवशी दर्शन घेतील. मात्र इतर 'व्हीआयपी' असणाऱ्या लोकांना त्या दिवशी दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. पालख्यांच्या मानकऱ्यांना परंपरागत दर्शनाच्या सोयीसाठी पासेस देतो, ती प्रथा कायम राहणार आहे."

Pandharpur Temple
BJP Vs NCP : भाजपचा डाव यशस्वी; राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून शिरूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक तीन महिने लांबणीवर

आषाढी एकादशी दिवशी दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांना काही तास दर्शन रांगेत उभे रहावे लागते. त्यातच राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेतात. यामुळे वारकऱ्यांना आणखी त्रास सहन करावा लागतो. आता या निर्णयामुळे हे बंद होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसमवेत असेलेले लोक आणि पालखीच्या मानकऱ्यांना या दिवशी दर्शन घेता येणार आहे. या निर्णयाचे वारकऱ्यांनी स्वागत केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com