BJP Vs NCP : भाजपचा डाव यशस्वी; राष्ट्रवादीला फायदा होऊ नये म्हणून शिरूर खरेदी-विक्री संघाची निवडणूक तीन महिने लांबणीवर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोयीचे होऊ नये, यासाठी शिरूर भारतीय जनता पक्षाने खेळलेली खेळी यशस्वी ठरली आहे.
NCP and BJP
NCP and BJP Sarkarnama

Shirur Kharedi and Vikri Sangh Election : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोयीचे होऊ नये, यासाठी शिरूर भारतीय जनता पक्षाने खेळलेली खेळी यशस्वी ठरली आहे. खरीप हंगामाचे कारण सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी केली. विशेष म्हणजे राज्याच्या सहकार आणि पणन मंत्रालयाने ती मागणी मान्य केली आहे. संघाची निवडणूक तीन महिने पुढे ढकलत असल्याचे जाहीर करत तसे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. (Election of Shirur kharedi and vikri Sangh postponed for three months)

दरम्यान, शिरूर (Shirur) बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भातील (Bazar samiti) प्रकरण उच्च न्यायालयात आहे. ते सध्या निकालाच्या अंतिम टप्प्यात आहे. खरेदी विक्री संघ आणि बाजार समितीच्या निवडणुका एकाच वेळी होणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर होते. मात्र, राष्ट्रवादीचा (NCP) फायदा होऊ नये, यासाठी शिरूर भाजपकडून (BJP) एक राजकीय डाव टाकण्यात आला. खरेदी विक्री संघाची निवडणूक पुढे ढकलणे सध्या तरी भाजपच्या पथ्यावर पडले आहे.

NCP and BJP
Supriya Sule On BJP Leader : निवडणुकांमुळे मुंबईची टोळी वारीत; सुप्रिया सुळेंची नाव न घेता भाजप नेत्यांवर टीका

सभासद नव्याने करण्याच्या मुद्यावरून शिरूर कृषी उप्तन्न बाजार समितीची निवडणूक उच्च न्यायालयात अडकली आहे. वास्तविक बाजार समितीची मुदत दीड वर्षापूर्वीच संपली आहे. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादीच्या शह कटशहाच्या राजकारणामुळे ही निवडणूक न्यायालयीन फेऱ्यात आहे. येत्या आठ दिवसांत बाजार समितीची निवडणूक घेण्याबाबत निकाल येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच भाजपकडून खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळविली आहे.

NCP and BJP
Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

शिरूर खरेदी-विक्री संघाचीही मुदत १० जून २०२२ रोजी संपली आहे. संघाच्या मतदारांची प्रारुप यादी १२ जून रोजीच खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे ही निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता होती. पण, भाजपचे शिरूर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी पावसाळा व शेतीच्या पेरण्यांची कारणे सांगत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सहकार मंत्र्यांकडे केली. त्यावर सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातून सोनवणे यांच्या मागणीचा विचार करून खरेदी विक्री संघाची निवडणूक तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. त्याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

NCP and BJP
Dilip Walse Patil News : ...तोपर्यंत माझ्या मनाला आनंद मिळणार नाही; वळसे पाटलांनी व्यक्त केली खंत

सहकार आयुक्त व निबंधक, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक आदींना ते परिपत्रक पाठविण्यात आले आहे, त्यामुळे शिरुर खरेदी-विक्री संघाची निवडणूक आता पुढील तीन महिने होणार नाही, हे निश्चित आहे. या निर्णयाने शिरुर भाजपची खेळी यशस्वी ठरली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काहींशी बॅकफूट गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com