Politics : पार्थ पवार - शंभूराज देसाईंच्या भेटीचे कारण काय? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..

Maharashtra Politics : पार्थ पवारांनी अचानक शंभूराज देसाईंची भेट घेतती होती...
Ajit Pawar, Shambhuraj Desai,
Ajit Pawar, Shambhuraj Desai, Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे (NCP) युवा नेते पार्थ पवार यांनी काल (19 जानेवारी) साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांची मुंबईतील पावनगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. पार्थ पवार यांनी अचानक शंभूराज देसाई यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

मात्र, या भेटीचे कारण काय होते? याचे स्पष्टीकरण अजित पवारांनी आज (21 जानेवारी) दिले आहे. ''राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुश्मन नाही. राजकीय टीका केली तरी विकास कामाबद्दल चर्चा होतच असते,'' असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले आहे. ते आज सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

Ajit Pawar, Shambhuraj Desai,
Dombivali News : ठाकरे गटाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्तांचा खोडा : अखेर न्यायालयात बाजी जिंकली!

पार्थ पवार (Parth Pawar) यांनी शंभूराज देसाई यांची त्यांच्या पावनगड या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. ही भेट खासगी असून यावेळी विविध विकासकामांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले होते. तर या भेटीबाबत पार्थ पवार यांनी काहीही भाष्य केले नव्हते. त्यातच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी या भेटीवर मोठा दावा केला होता. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Ajit Pawar, Shambhuraj Desai,
Parth Pawar : शंभूराज देसाईंना पार्थ पवार भेटले अन् चर्चांना उधाण आलं

गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे म्हणाले होते की, ''पार्थ पवार अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शंभूराजे देसाई यांची भेट घेतली असावी. रोहित पवार हे आमदार झाले. बारामती अॅग्रोही त्यांच्याकडे आहे. महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही झाले आहेत. आजोबांकडून अन्याय होत असल्याची भावना पार्थची असेल'', असं ते म्हणाले होते. मात्र, आज या सर्व चर्चांवर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com