BJP News: स्वगृही आलेल्या श्याम देशपांडेंना भाजप कोणती जबाबदारी देणार?

Pune News: दोन वर्षे शिवसेनेचे शहराध्यक्ष पदही सांभाळले
Shyam Deshpande, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Shyam Deshpande, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama

Pune BJP : उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी पुण्यातील कोथरूडचे शिवसेनेचे माजी नगरसेवक श्याम देशपांडे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर देशपांडे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. आज देशपांडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) देशपांडेंवर काय जबाबदारी सोपवणार, याकडे राजकीय वर्तुळातील मंडळींचे लक्ष लागले आहे.

पूर्वीच्या शिवसेना पक्षाचे पुण्यातील माजी नगरसेवक राहिलेले श्याम देशपांडे (Shyam Deshpande) यांचा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देशपांडे हे पुणे महापालिकेचे दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत.

गेल्या वर्षी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कारवाई केल्यापासून ते कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. आज त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Shyam Deshpande, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Old Pension : ‘जुनी पेन्शन’ने सरकारचे टेन्शन तर वाढवलेच, आता विद्यार्थ्यांनाही आले ‘हे’ टेन्शन !

उद्धव ठाकरे यांनी २०२२ मध्ये मुंबईतील एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) टीका केली होती. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी श्याम देशपांडे (Sham Deshpande) यांनी जाहीरपणे पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपण आजपासून शिवसेनेचे काम थांबवत असल्याचेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर शिवसेनेकडून देशपांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची मे २०२२ मध्ये शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

Shyam Deshpande, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Koregaon : महेश शिंदेंचे प्रयत्न; कोरेगावसाठी अर्थसंकल्‍पातून ११४ कोटींचा निधी

कोण आहेत शाम देशपांडे?

श्याम देशपांडे हे १९७२ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. श्याम देशपांडे (Shyam Deshpande) शिवसेनेकडून कोथरूडमधून २००२ आणि २००७ असे दोन वेळा नगरसेवक होते. देशपांडे यांनी २००८-०९ मध्ये महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्षपद देखील भूषवलेले आहे. त्यांच्या पत्नी २०१२ आणि २०१७ अशा दोन वेळा नगरसेविका होत्या.

दरम्यान, श्याम देशपंडे यांनी २०१२ ते २०१४ या कालावधीत शिवसेनेचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना कोणती जबाबदारी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com