Ajit Pawar News : शिरुरच्या लाजिरवाण्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या 'त्या' चार आमदारांबाबत अजितदादा काय भूमिका घेणार ?

Shirur Loksabha Election 2024 Result : हक्काच्या एकगठ्ठा माळी मतांचे विभाजन झाले नसते,तर कोल्हेंचे लीड आणखी वाढले असते
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSarkarnama

NCP Election Result 2024 News : शिरुर लोकसभेतून आघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार डॉ.अमोल कोल्हे हे एक लाख चाळीस हजार 951 मतांनी निवडून आले. त्यांच्या हक्काच्या माळी मतांत यावेळी त्यातही हडपसर विधानसभा मतदारसंघात विभागणी झाली. त्यामुळे त्यांच्या दोन लाखांच्या लीडने विजयी होण्याच्या दाव्याला खीळ बसली. भोसरीत त्यांना नऊ हजारांची मिळालेली पिछाडीही त्याला कारणीभूत ठरली.

दरम्यान, शिरुरमध्ये सलग दुसऱ्यांदा कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा पराभव गेला. ते यावेळी महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार होते. 2019 ला त्यांचा खासदारकीचा चौकार हा कोल्हेंनीच हुकवून ते प्रथम खासदार झाले.त्यावेळी ते युतीत शिवसेनेकडून लढले होते.

शिरुरमध्ये माळी मते लक्षणीय आहेत. गेल्यावेळी ती एकगठ्ठा पडल्याने कोल्हेंच्या विजयात हातभार लागला होता. यावेळी,मात्र त्यात आणि त्यातही हडपसरमध्ये विभागणी झाली. टिळेकर आणि शिवरकर यांच्यामुळे ती विभागली गेल्याची चर्चा आहे.त्यामुळे कोल्हेंच्या लीडला आळा बसला.

भोसरीत लांडगेची हवा ओसरत आहे का?

गेल्यावेळी आमदार महेशदादा लांडगे यांच्या भोसरीने आढळरावदादांना 37 हजारांचे लीड दिले होते. ते यावेळी 1 लाख देण्याचा निर्धार त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला होता. प्रत्यक्षात ते फक्त नऊ हजाराचेच मिळाले. त्यामुळे कोल्हेंचे लीड कमी झाले. पण,आढळरावांना अपेक्षित ते मिळू शकले नाही. त्यातून महेशदादांची हवा किमान लोकसभेला ओसरली की काय,अशी चर्चा ऐकायला मिळाली.

Ajit Pawar News
Gulabrao Patil : 'आपला पगार किती अन् आपण बोलतो किती?' ; गुलाबरावांनी राऊतांना डिवचले!

अजितदादा काय भूमिका घेणार?

चार आमदार असूनही शिरुरमध्ये आढळरावांचा पराभव झाला हे अजित पवारांच्या दृष्टीने खूपच मानहानीकारक ठरले आहे.बारामतीमध्ये पत्नी सुनेत्रांच्या पराभवानंतर त्यांना बसलेला हा डबल धक्का ठरला.

या आमदारांच्या मतदारसंघात भरीव लीड मिळेल,अशी आशा असताना तेथेच आढळराव मोठ्या मतांनी पिछाडीवर पडल्याने त्यांचा पराभव झाला. जुन्नरमध्ये ते सर्वाधिक मतांनी मागे पडले.त्यानंतर खेड,हडपसर आणि आंबेगावचा वाटा राहिला.त्यामुळे तेथील आमदारांविषयी अजितदादा आता काय भुमिका घेणार य़ाकडे आता लक्ष लागले आहे.

वंचित `शिरुर`लाही मतांपासून वंचितच

मावळमधील वंचित बहूजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांना यावेळी फक्त 27,768 मते मिळाली.त्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त झाले.तशीच वेळ शिरुरमध्ये वंचितचे उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्यावर आली.

त्यांना फक्त 17,462 मते मिळाली.`एमआयएम`शी युती नसल्याने यावेळी `वंचित`च्या उमेदवारांना मतांपासून वंचितच राहण्याची वेळ शिरुरच नाही, राज्यभर आली.`शिरुर`मध्ये शेख यांच्यापेक्षा तेथील अपक्ष मनोहर वाडेकर यांनी जास्त मते खेचली,हे विशेष.त्यांनी 28,330 म्हणजे तिसऱ्या नंबरची मते घेतली.

(Edited By Deepak Kulkarni)

Ajit Pawar News
Sanjay Kute : संजय कुटे ठरले 'किंगमेकर'; प्रतापराव जाधवांच्या विजयासाठी अशी राबवली रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com