Ajit Pawar: "मुंडेंना पुन्हा संधी द्यायला हवी म्हणालो तर काय चुकलं"; अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरुए?

कृषी घोटाळ्या संदर्भात सुरू असलेल्या एका केसमध्ये न्यायालयाने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिली आहे.
Ajit Pawar Dhananjay Munde 1
Ajit Pawar Dhananjay Munde 1Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : कृषी घोटाळ्या संदर्भात सुरू असलेल्या एका केसमध्ये न्यायालयाने तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचीट दिली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा बीड प्रकरणांमध्ये दुरान्वये संबंध नसल्याचं समोर आल्यास त्यांना पुन्हा संधी देण्यात येईल असं म्हटलं होतं. पण त्यांच्या या विधानानंतर विरोधक पुन्हा आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना मुंडेंना पुन्हा संधी द्यायला हवी म्हणालो तर काय चुकलं? असा उलट सवाल अजित पवारांनी विरोधकांना केला आहे.

Ajit Pawar Dhananjay Munde 1
Nitin Gadkari: "सरकार म्हणजे निकम्मी यंत्रणा"; गडकरींच्या विधानाची चर्चा; नेमकं काय म्हणाले?

अजित पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं?

शुक्रवारी अजित पवारांनी कृषी विभागा संदर्भातील घोटाळ्यात धनंजय मुंडे यांचा कुठेही सहभाग नाही, असं न्यायालयाच्या हवाल्याने सांगितलं. मात्र, या प्रकरणात त्यांची बदनामी व्हायची ती झाली, त्याचा त्रास त्यांना आणि त्यांच्या परिवाराला झाला. त्याचसोबत आणखीन एका प्रकरणात चौकशी सुरू असून सर्व सत्य समोर येईल आणि त्यामध्ये त्यांचा संबंध नसल्यास त्यांना पुन्हा संधी देऊ असं संकेत अजित पवार यांनी दिले होते.

Ajit Pawar Dhananjay Munde 1
Tejsvi Yadav: तेजस्वी यादव बिहारची निवडणूक लढणार नाहीत? लालू प्रसाद यादवांचं स्वप्न अधुरं राहणार?

त्यांच्या या संकेतानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. यानंतर याबाबत अजित पवारांनी माध्यमांसमोर बोलताना खुलासा केला आहे. पवार म्हणाले, "तुम्ही इतक्या चुकीच्या बातम्या लावता म्हणून मला तुमच्याशी बोलायला आवडत नाही. मी काल मराठीमध्ये सांगितलं होतं कृषी घोटाळ्याबाबत जे कोणी कोर्टामध्ये गेले होते, त्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडे यांना कोर्टाने क्लीनचीट दिली आहे. मात्र, बीडच्या बाबतीत न्यायालयीन चौकशी सुरु आहे. त्याबाबत अद्याप अहवाल आलेला नाही. जर याबाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर आम्ही त्याबाबत विचार करू असं मी बोललो होतो. यापेक्षा वेगळं काही बोललं नव्हतो मग त्यामध्ये माझी काही चूक आहे का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.

एखाद्या प्रकरणात व्यक्तीवर जर आरोप करण्यात आले आणि चौकशीनंतर तो दोषी ठरला नसेल तर त्या व्यक्तीला संधी द्यायला हवी, असं आपलं मत असल्याचं अजित पवार याप्रकरणात स्पष्टीकरण देताना म्हणाले.

Ajit Pawar Dhananjay Munde 1
Ravindra Chavan: 'संविधान बचाव'ची 'शो'बाजी करणारे...; PM मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधींना रविंद्र चव्हाणांचं उत्तर

अजित पवारांच्या मनात काय सुरु?

नाराजी व्यक्त करणाऱ्या विरोधकांना अजित पवारांनी विरोधकांना उलटा सवाल केला आहे. यावरुन त्यांच्या मनात धनंजय मुंडेंबाबत नेमकं काय सुरु आहे? याचा अंदाज येतो. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे खंदे समर्थक आणि विश्वासू आमदार आहेत. त्याचबरोबर आक्रमक नेते म्हणून मुंडेंची ओळख आहे, त्यांनी आजवर विविध मंत्रीपदांवर यशस्वीपणे काम केलं आहे. त्याचबरोबर पक्षावर जर कुठला अडचणीचा प्रसंग ओढवला तर मुंडे त्यावर उत्तर द्यायला किंवा सावरुन घ्यायला सक्षम व्यक्ती आहेत, हे अजित पवारांना चांगलं माहिती आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळात त्यांची पुन्हा वर्णी लागावी आणि मंत्रिपदही द्यावं यासाठी अजित पवार आग्रही आहेत. पण संतोष देशमुख प्रकरण, वाल्मिक कराड प्रकरण आणि आता महादेव मुंडे प्रकरणं अद्यापही चर्चेत असल्यानं अजित पवारांना थेटपणे असा निर्णय घेणं राजकीयदृष्ट्या नुकसानकारक ठरू शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com