मुंबई : 'शक्ती विधेयक राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राष्ट्रपतींकडे जाते. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रुपांतर होते. त्यानंतर त्याची अमंलबाजवणी होईल. पण सध्या राज्य सरकार आणि केंद्रातील भाजप सरकारमधील संबंध पाहता त्यावर आता काही बोलणे योग्य ठरणार नाही. पण बाकीच्यांसारख्या आम्ही हवेत बोलत नाही, जोपर्यंत विधेयकावर राष्ट्रपतींची सही होत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर काहीही बोलणार नाही,' असे स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले. (Rupali chaknkar latest news)
सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या. मागील हिवाळी अधिवेशनात शक्ती विधेयक मंजूर करण्यात आले, पण त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही, असा सवाल रुपाली चाकणकर यांना विचारण्यात आला होता.
- दिशा सॅलियनच्या बदनामीमुळे तिचे आई वडील त्रस्त
अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियनची जी बदनामी सुरु आहे, त्यामुळे तिच्या आई वडीलांना त्रास होत आहे. त्यांंनी स्वत: माझी भेट घेऊन तक्रार केली. त्यांचा त्रास पाहून आम्हीही व्यथित झालो. एखाद्या मृत व्यक्तीची अशा प्रकारे बदनामी होत असेल तर ती निंदनीय आहे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले. सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत माहिती दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मृत दिशा सॅलियनच्या बाबतीत अनेक गंभीर आरोपही केले आहेत. या सर्व आरोपांवर रुपाली चाकणकर यांनी भुमिका स्पष्ट केली. राज्य महिला आयोग नेहमी अॅक्टिव्ह आहे. सिनियर सिटिझन असल्यामुळे कायद्याप्रमाणे आम्ही दिशाच्या घरच्यांची तक्रार घेतली.
दिशा सॅलियनच्या कुटुंबियांनी महिला आयोगाकडे नारायण राणेंच्या विरोधात तक्रार केली. त्यानंतर मालवणी पोलिसांकडे दिशाच्या आत्महत्येचा अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवाला दिशाने आत्महत्या केल्याचंच स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर तिच्यावर कोणत्याही प्रकारचा अतिप्रसंग झाला नसल्याचे आढळून आले असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
- राष्ट्रवादी महिला नेतृत्त्वासाठी प्रयत्नशील
राष्ट्रवादी काँग्रेस हा पुरोगामी पक्ष आहे. सध्या पक्षात महिलांचे नेतृत्व कमी असले तरी राष्ट्रवादी नेहमी महिलांना पुढे आण्यासाठी प्रयत्न करत आहे. येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीत अनेक महिला आपल्याला दिसतील. त्यासाठी पक्ष संघटन महिलांना प्रशिक्षण देत आहे, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महिला नेतृत्त्वाविषयीही आपली भुमिका मांडली.
याच वेळी बोलताना त्यांनी चित्रा वाघ आणि भाजपच्या लोकांना प्रत्येक दिवशी सकाळी स्क्रिप्ट दिली. ज्यात त्यांना दिवसभर काय बोलायचे असते ते दिले जाते, तेच ते दिवसभर बोलत असतात, असे म्हणत त्यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ आणि भाजप नेत्यांना टोलाही लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.