Devendra Fadnavis : मोठी बातमी! फडणवीसांविरोधात धंगेकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दिली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्तांकडे दिली आहे.

Devendra Fadnavis
Kasba By Election : निकालाआधीच कसब्यात धंगेकर समर्थकांनी भाजपला डिवचलं; 'ही' कविता सोशल मीडियावर व्हायरल

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २३ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणात हिंदुत्वाचा उल्लेख करून स्पष्टपणे मतदारांना भडकवल्याचा धंगेकर यांनी हा आरोप केला आहे. तसेच धंगेकरांनी निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे असं तक्रारीत नमूद केलं आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : राऊतांचे टेन्शन वाढले?; हक्कभंग समितीत राहुल कुलांसह राणेंचा समावेश

मतदानाच्या आदल्या दिवशी (शनिवारी) कसबा पेठेत भाजपचे पदाधिकारी हे मतदारांना पैसे वाटत होते, असा आरोप करीत धंगेवर यांनी केला होता. त्यानंतर ते उपोषणास बसले होते. आचारसंहिता असताना त्यांनी कसबा गणपतीसमोर उपोषण केल्याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काल (रविवारी) मतदान झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री व नेते कसबामध्ये पैसे वाटत फिरत होते, त्यांच्याकडून ३० कोटी रूपये वाटले गेल्याचा अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप धंगेकरांनी केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com