Pune Congress: शहराध्यक्षपदाच्या वादावर पडणार पडदा? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काढला तोडगा

Harshvardhan Sapkal to Decide Next Pune Congress Chief: पुणे काँग्रेससाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले सतेज ऊर्फ बंटी पाटील हेदेखील बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा होणार आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे शहर काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली अंतर्गत गटबाजी, शहराध्यक्ष पदावरून सुरू असलेली कुरघोडी आणि पक्षातून होणारी गळती यामुळे निर्माण झालेला गोंधळ अखेर थांबवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मुंबईत बोलावून घेतले आहे. उद्या (बुधवारी)मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

बैठकीत पुण्यातील सर्व गटबाजी, मतभेद आणि पदांच्या वादावर चर्चा होणार आहे. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न सपकाळ करणार आहेत. विशेषतः शहराध्यक्ष पदाच्या बदलासंदर्भातील चर्चांना बैठकीत निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. सध्या या पदावरून अनेक इच्छुकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे पक्षातील अंतर्गत वातावरण अधिकच तापले आहे.

बैठकीला पुणे काँग्रेससाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले सतेज ऊर्फ बंटी पाटील हेदेखील उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींना सादर केलेल्या अहवालावर सविस्तर चर्चा होणार आहे. त्या अहवालाच्या आधारावर पुणे काँग्रेसमधील बदल निश्चित होतील. पाटील यांनी सूचवलेले संघटनात्मक बदलही बैठकीत अंतिम केले जाऊ शकतात.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील सुरू असलेली गटबाजी, कुरघोड्या आणि गळती ही पक्षाला परवडणारी नाही. त्यामुळे आत्ताच या सर्व गोष्टींचा निकाल लावणे आवश्यक असल्याने हर्षवर्धन सपकाळ बैठकीनंतर शहराध्यक्ष पदाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं जाते.

Congress
Vijay Rupani: जय प्रकाश नारायण ते मोदींपर्यंत... सर्वांच्या पसंतीस उतरलेले विजय रुपाणी यांचे हे 10 दुर्मिळ फोटो

सध्या शहरातील तीन गट, तीन इच्छुक उमेदवारांना शहराध्यक्ष करावं यासाठी ताकद लावताना पाहायला मिळत आहेत. यामध्ये सध्याचे शहराध्यक्ष असलेल्या अरविंद शिंदे यांचा एक गट, दुसरा गट माजी आमदार मोहन जोशी यांचा तर तिसरा गट माजी आमदार रमेश बागवे यांच्या नेतृत्वात असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ नेमकं कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार आणि कोणत्या गटाचा शहराध्यक्ष होणार आणि त्यावर इतर दोन गटांकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेला आहे. सगळ्या गोष्टींवर हर्षवर्धन सपकाळ नेमका कोणता तोडगा काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com