Shirur LokSabha News: राष्ट्रवादीला शिरूर लोकसभेसाठी सापडला पर्याय; अमोल कोल्हेंचं काय होणार ?

Dr. Amol Kolhe : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी
Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhe Sarkarnama

NCP News: आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या असताना राजकीय पक्षांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यासाठी राष्ट्रवादीकडून लोकसभा मतदारसंघ आढावा बैठक मुंबईत मंगळवारी आणि आज बुधवारी (दि.30 आणि 31 मे) घेण्यात येत आहे. या बैठकीमध्ये राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. याबरोबरच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी देखील करण्यात येत आहे.

Dr. Amol Kolhe
Kalyan LokSabha News : श्रीकांत शिंदेंची डोकेदुखी वाढणार? ठाकरे गट कल्याणमध्ये सक्रिय : भोईरांचा लोकसभा जिंकण्याचा निर्धार

आजच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवरच शिरुर लोकसभा मतदारसंघातून 2024 च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असणार? याबाबतची अनेकांना उत्सुकता आहे.

सध्या या मतदारसंघातून डॉ.अमोल कोल्हे हे विद्यामान खासदार आहेत. तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून डॉ.अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सुत्रांकडून समजती आहे.

Dr. Amol Kolhe
Ahmednagar Name Change : अहमदनगरच्या नामांतराबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

याआधी दिलीप वळसे पाटील यांनी या मतदारसंघातून लोकसभा लढवावी, असा आग्रह अनेकांचा होता. पण त्यांनी लढवली नव्हती. मात्र, आता 2024 च्या लोकसभेला त्यांनी शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा त्यांना आग्रह असल्याचं बोललं जात आहे. पण याबद्दल ते काय भूमिका घेतात? ते महत्वाचं असणार आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी या सर्व चर्चा फेटळल्या होत्या. याच चर्चांमुळे दिलीप वळसे पाटील यांचं नाव या मतदारसंघातून समोर येत तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.

Dr. Amol Kolhe
Pritam Munde On Women Players: महिला खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कुणी न जाणे हे खेदजनक..

वळसे पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आहेत. त्यामुळे वळसे पाटील यांच्या निमित्ताने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीला पर्याय सापडला आहे का? मग अमोल कोल्हेंचं काय होणार? असे अनेक सवाल आता उपस्थित करण्यात येत आहेत.

तसेच राष्ट्रवादीकडून काय रणनीती आखण्यात येते? कुणाला उमेदवारी देण्यात येते हे आत्ता सांगता येणार नसलं तरी जशी निवडणूक जवळ येईल तसं राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे पुणे जिल्ह्यात काय-काय राजकीय हालचाली होतात? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

दरम्यान, आगामी लोकसभेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पुढे काय रणनीती ठरवते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com