Chandrakant Patil : पुढच्या आषाढीची पूजा कोण करणार?; चंद्रकांतदादांनी केला मोठा दावा

Ashadhi Wari Worship : महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune, 30 June : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. जागा वाटपावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या प्राथमिक चर्चा होताना दिसत आहे. संतांच्या पालख्या आज पुण्यनगरीत होत्या. संतांच्या दर्शनासाठी आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आषाढी एकादशीची पुढची पूजा करणार, अशी गुगली टाकून त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रकांतदादांनी त्यावर उत्तर देताना मोठा दावा केला आहे.

आगामी आषाढी एकादशीला (Ashadhi Ekadashi) महायुतीचे (Mahayuti) मुख्यमंत्री पांडुरंगाची महापुजा करतील, असे सांगून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पत्रकाराच्या गुगलीवर षटकार ठोकत आपल्यातील कसलेल्या राजकारण्याचे दर्शन घडविले. पुण्यात माध्यमांशी बोलताना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादांनी सेफ उत्तर देत कोणत्याही वादात न अडकण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जी त्रिमूर्ती आहेत. ते जागा वाटपासारख्या चर्चा वेळेवर करण्यासाठी अगदी सक्षम आहेत. इतरांसारखे प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदा घेऊन बातम्या लिक करणे, असे काही करणार नाहीत.

महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील जागांचे वाटप लवकर होईल. जेणेकरून प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवारांची निश्चिती लवकर करता येईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुढच्या आषाढी एकादशीला पूजा कोण करणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिले. पुढच्या आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतील, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Chandrakant Patil
Prashant Paricharak : पंढरपुरातील बैठकांतून परिचारकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की विधान परिषदेसाठी दबाबतंत्र?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com