Nana Patole On Dhangekar : काँग्रेसच्या बॅनरवर धंगेकरांचे फोटो का नाहीत? नाना पटोले म्हणाले...

Pune Congress News : पटोलेंच्या उत्तराने एकच हशा पिकला...
Nana Patole On Ravindra Dhangekar
Nana Patole On Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करत निशाणा साधला आहे. आज पटोले पुण्यात काँग्रेस भवन येथे दाखल झाले होते. या वेळी राज्यातील काँग्रेस नेत्यांसह पुणे काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी विशेष बाब म्हणजे पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग आणि बॅनरवर कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो आढळून न आल्याने चर्चांना उधाण आले होते. (Latest Marathi News)

Nana Patole On Ravindra Dhangekar
Nana Patole On Prakash Ambedkar: 'वंचित'च्या 'इंडिया आघाडी'तील एन्ट्रीबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान

या वेळी पत्रकार परिषदेत नाना पटोले यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुमच्या स्वागताच्या फलकांवर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे फोटो दिसत नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर यावर पटोलेंनी हसत हसत उत्तर दिले. पटोले म्हणाले, "तुम्हा पत्रकारांना आमची फारच काळजी आहे. मात्र, याबाबत मला काही कल्पना नाही. याची माहिती घेऊन मी आपणास सांगतो," पटोलेंच्या या विधानानंतर पत्रकार परिषदेत हलकासा हशा पिकला.

Nana Patole On Ravindra Dhangekar
NCP Politics : आझमभाईंची घरवापसी वाढवणार अजित पवारांची डोकेदुखी

भाजपवर निशाणा -

भाजप सरकार हे रावणसारखी जुलमी प्रवृत्तीचे आहे. या देशात महागाई, बेरोजगारी कोणी वाढवली? मागील दहा वर्षांपासून भाजप शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. याबाबत एक जन चळवळ उभी करणार आहोत. काँग्रेस पक्षांकडून चळवळ उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस संघटनातून भाजपच्या रावण प्रवृत्तीचं दर्शन आम्ही जनतेला घडवणार आहोत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com