Uday Samant On Khadse:'...म्हणून खडसेंना मंत्रिपदावरून जावं लागलं'; उद्योगमंत्री सामंतांचा गौप्यस्फोट

Uday Samant and Eknath Khadse : खडसे भाजपमध्ये असतानाही नोटीस आली होती, उद्योगमंत्री सामंत यांचे मोठे विधान
Uday Samant and Eknath Khadse
Uday Samant and Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Pimpri News: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबाला अवैध गौणखनिज उत्खननप्रकरणी राज्य सरकारने (महसूल विभाग) १२७ कोटी रुपये दंडाची नोटीस नुकतीच बजावली. मात्र, ही पहिलीच नोटीस नसून यापूर्वीही ते भाजपमध्ये आणि भाजपच्या सरकारमध्ये मंत्री असताना ती आली होती, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे केला. याद्वारे विरोधकांना राज्य सरकार टार्गेट करीत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनरल मोटर्सच्या आंदोलक कामगारांना भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. खडसे हे भाजपमध्ये असताना आणि भाजपचा मुख्यमंत्री असताना खडसेंनी काहीतरी केले म्हणूनच त्यांना मंत्रिपदावरून जावे लागले, असे सांगत सरकारच्या ताज्या नोटिशीचे सामंतांनी समर्थन केले.

Uday Samant and Eknath Khadse
NCP Crisis : मोठी बातमी ! जयंत पाटलांनी वाढवलं अजितदादांचं टेन्शन; 'ते' आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचा दावा

खडसेंनीच काहीतरी चुकीचे, अवैध काम केले असल्याचे अप्रत्यक्षपणे सूचित केले. तळेगावातून गेलेला फॉक्सकॉनचा विषय कधीच संपला असल्याचे त्यांनी सांगत त्यावर श्वेतपत्रिकाही निघाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरी राज्य हे परकीय गुंतवणुकीत देशात एक नंबरवर असून ते राहील, अशी ग्वाहीही दिली.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या एका युवकाने आज मुंबईत आत्महत्या केली. त्यावर बोलताना सामंतांनी एकनाथ शिंदे सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्याची जबाबदारी घेतली असून, ते देणारच ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले, पण नंतरच्या सरकारला ते टिकविता आले नाही, या शब्दांत त्यांनी त्याचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडले.

Edited by Ganesh Thombare

Uday Samant and Eknath Khadse
PCMC News : शरद पवार राष्ट्रवादीची तरुणाईत क्रेझ वाढली; महिन्यात यंग ब्रिगेड 'इन्कमिंग'ची झाली हॅट्रिक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com