Crime News : नगरसेवक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पत्नीनं पतीची केली हत्या, ओढणीनं गळा आवळला! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Chaitali Bhoir Nakul Bhoir : पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी चैताली भोईर हिला अटक केली आहे.
Pimpri Chinchwad murder: Chaitali Bhoir arrested for killing her husband Nakul Bhoir.
Pimpri Chinchwad murder: Chaitali Bhoir arrested for killing her husband Nakul Bhoir.sarkarnama
Published on
Updated on

PCMC News : आगामी महापालिका निवडणुकीत निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्या महिलेने आपल्या पतीची हत्या केल्याचा धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नकुल भोईर असे आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते.नकुल हा आपल्या पत्नीने निवडणूक लढवावी यासाठी तयारी करत होता.

नकुल यांची पत्नी चैताली भोईर यांनी मध्यरात्री दोनच्या सुमारास ओढणीच्या साहाय्याने नकुल यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. नकुल हे चैतालीवर वारंवार संशय घेत त्रास देत होता. त्यातून ही हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासून समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल भोईर पती पत्नीमध्ये कौटुंबीक वाद झाला होता. संध्याकाळी देखील त्यांच्या वाद झाला. मध्यरात्री दोन वाजता पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे रागाच्या भरात चैताली यांनी नकुल यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. पोलिसांनी याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत चैतालीला अटक केली.

Pimpri Chinchwad murder: Chaitali Bhoir arrested for killing her husband Nakul Bhoir.
BJP Politics : 'सर्वांचे मोबाईल, व्हॉट्सअ‍ॅप सर्वेलन्सवर टाकलेत..., मंत्री बावनकुळेंच्या वक्तव्याने खळबळ; आगामी निवडणुकीत बंडखोरी होऊ नये म्हणून भाजपचा नवा डाव?

नकुल-चैताली यांना पाच आणि दोन वर्षांची दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं आत रुममध्ये बाहेर झोपली होती तेव्हा बाहेरच्या रुममध्ये नकुल आणि चैतालीमध्ये वाद झाला. त्या वादातून चैतालीने नकुलचा गळा आवळून हत्या केली.

Pimpri Chinchwad murder: Chaitali Bhoir arrested for killing her husband Nakul Bhoir.
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय, 'त्या' संस्थांना नोंदणी अनिवार्य, एसओपी तयार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com