Dahihandi News : दहीहंडीच्या स्टेजची कमान अंगावर पडली, महिलेचा मृत्यू! तक्रार देण्यास नातेवाईकांचा नकार

Pimpri Dahi Handi Stage Arch Collapses : दहीहंडी उत्सवामध्ये स्टेजची कमान अंगावर पडून 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
Pimpri Dahi Handi Stage Arch Collapses Woman Dies
Pimpri Dahi Handi Stage Arch Collapses Woman Diessarkarnama
Published on
Updated on

Pimpri News : दहीहंडी उत्सवामध्ये स्टेजची कमान अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी पोलीस स्टेशन हद्दीत घटली आहे. मृत्य महिलेचे नाव सलमा पठाण (वय 45) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवीमध्ये शुक्रवारी (ता.4) रात्री साडेदहाच्या दरम्यान लेन नंबर 02 येथील विघ्नहर्ता दहीहंडी मित्र मंडळाची दहीहंडी फुटल्यानंतर स्टेजची कमान उतरत असताना तेथे असलेल्या सलमा यांच्या अंगावर पडली.

दहीहंडी पाहण्याकरिता सलाऊददीन पठाण व त्यांची पत्नी सलमा पठाण हे तेथे आले होते. दहीहंडी संपल्यानंतर सलाऊददीन यांनी आपल्या पत्नीला घरी जाण्यासाठी बोलवले. त्या परत येत असताना स्टेजची कमान उतरत असताना त्याचा लोखंडी अँगल अंगावर पडून सलमा या गंभीर जखमी झाले.

Pimpri Dahi Handi Stage Arch Collapses Woman Dies
108 Ambulance : परभणीत रुग्णवाहिकेसाठी 108 नंबरवर 7 फोन, 2 तासांचा कथित विलंब; गर्भवतीसह बाळही दगावलं; 5 जणांवर गुन्हा

त्यांना औंध रुग्णालयात उपचाराकरीता नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विघ्नहर्ता दहीहंडी मंडळात मृत सलमा यांचा मुलगा कार्यकर्ता असल्याने महिलेचे पती ,मुलगा व इतर नातेवाईकांनी घटनेबाबत तक्रार देण्यास तयार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची नोंद अकस्मात मयत करण्यात आली असून मंडळाने परवानगी घेतली होती का? कमान उतरवण्याची जबाबदारी कोणाकडे होती आदीची चौकशी करण्यात येत आहे.

Pimpri Dahi Handi Stage Arch Collapses Woman Dies
Dombivli train Accident : डोंबिवलीत लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या मुलीच्या अपघाताला धक्क्कादायक वळण, पोस्टमार्टेममधून समोर आली वेगळीच माहिती

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com