Namdevrao Jadhav Black ink Attack : होय, आम्हीच नामदेवराव जाधवांना काळं फासलं; राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली जबाबदारी!

NCP Political News : " पवारांवरची टीका खपवून घेणार नाही!"
Namdevrao Jadhav
Namdevrao Jadhav Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ते मराठा आरक्षणावरूनही जाधव यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता.

याच क्तव्यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पुण्यात काळं फासलं आहे. यानंतर जाधव हेदेखील चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी या हल्ल्यामागे शरद पवार आणि रोहित पवारच असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

Namdevrao Jadhav
Maratha Reservation : ''...'या' पापाचे प्रायश्चित महाविकास आघाडीला भोगावेच लागेल''; राधाकृष्ण विखेंचे टीकास्त्र!

पुण्यात नामदेव जाधव यांचा शनिवारी भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रम होणार होता, पण इन्स्टिट्यूटने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर नामदेव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार भवनासमोर आले होते, पण याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर काळं फासल्याचा प्रकार घडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या आंदोलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते म्हणाले, आम्ही आजच्या या आंदोलनाची जबादारी स्वीकारत आहोत. होय,आम्ही नामदेवराव जाधव (Namdevrao Jadhav) यांना काळं फासलं. या जाधवांना विक्रोळी पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक केली होती. एका शाळेत पैसे घेऊन मुलांचे मार्क्स वाढवल्याप्रकरणी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती आणि आज तेच शरद पवार यांच्यावर टीका करत असल्याचे जगताप म्हणाले.

जगताप म्हणाले, लोकशाहीमध्ये टीका करण्याचा अधिकार आहे, पण तो खऱ्या पुराव्यावर करावी. शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात 60 वर्षांपासून जास्त कालावधीपासून आहेत. ते त्यांच्यावर नाहक खोटे आरोप केले जातात. हे आरोप होत असताना पुरावे सादर केले जात नव्हते. पुरावे असते तर निश्चित टीका करावी. आम्ही आठ दिवसांचा कालावधी दिला होता. आम्ही त्यांना इशारा देऊनही ती भाषा थांबवली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासवलं, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली.

" पवारांवरची टीका खपवून घेणार नाही!"

शरद पवारांवर टीका केली तर खपवून घेणार नाही, असा इशारा देतानाच आमच्याविरोधात कारवाई व्हायची ती होऊ द्या. शरद पवार यांच्याविषयी नामदेव जाधव सातत्याने विरोधात वक्तव्य करत आले आहेत. ते कोणीतरी सोडलेलं पिल्लू आहे. नाही तेव्हा शरद पवारांचे पाया पडायला यायचा असेही ते म्हणाले.

Namdevrao Jadhav
Maratha, Dhangar Reservation शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट; मराठा, धनगर आरक्षणासाठी केली ‘ही’ मागणी

जाधव नेमकं काय म्हणाले...?

नामदेवराव जाधव यांनी काळं फासल्याच्या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना राग अनावर झाला. आणि तसेच माझा पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रमही उधळून लावला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला. हा हल्ला शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेणाऱ्या गुंडांनी करवून आणला. या विचारांचा त्यांनी खून केला असल्याची टीका त्यांनी केला.

मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार असल्याचे कागदपत्रे हाती असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वास्तव स्वीकारलेलं नाही. या हल्ल्यामागे शरद पवार आणि रोहित पवार (NCP) आहेत. त्यामुळे त्यांची खासदारकी, आमदारकी रद्द करण्यासाठी मोठं पाऊल उचलणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Namdevrao Jadhav
Maratha Reservation News : जरांगे भुजबळांवर एकेरी भाषेत टीका करतात, तेव्हा संभाजीराजे गप्प का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com