NCP Politics : शरद पवारांचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार? अजित पवारांच्या विश्वासू मंत्र्याने स्पष्ट सांगितलं, 'एकच....'

Sharad Pawar Ajit Pawar Alliance : जिल्हा परिषद निवडणुकीत शरद आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी मिळून ही निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह्यावर शरद पवारांचे उमेदवारांनी लढण्याचा आग्रह धरला जात आहे.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit Pawar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत निर्णय झाल्यानंतर देखील निवडणुकीमध्ये तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्ह घेऊन मैदानात उतरण्याबाबत वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षातील नेत्यांनी फक्त घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी आग्रही होते. मात्र यासाठी कुठेतरी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अनुकूल नव्हती. त्यामुळे अखेरच्या क्षणी ही आघाडी तुटण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती. मात्र अखेर दोन्ही चिन्हावर निवडणूक रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय झाला आणि तात्पुरता तोडगा काढण्यात आला.

त्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्रित निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मात्र आता या निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांनी सुरुवातीलाच एका चिन्हावर निवडणूक लढवावी हा आग्रही भूमिका लावून धरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील दोन वेगवेगळी चिन्ह घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उतरल्यामुळे पक्षाला काही प्रमाणात फटका बसला, असे देखील मत व्यक्त केले आहे. यानंतर मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी देखील एका चिन्हावर निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका मांडली आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकामध्ये जो पराभव झाला तो आम्ही स्वीकारला आहे. आम्ही आमचे उमेदवार या पराभवातून बरच काही गोष्टी शिकतील. मात्र याबाबत आम्ही ईव्हीएमला कोणताही दोष देणार नाही असं भरणे म्हणाले.

Sharad Pawar Ajit Pawar
Mahapalika Election : क्या व्हिक्टरी है यार..! मोदींच्या मंत्र्यांची फडणवीसांना कडकडून मिठी; शिंदे, अजितदादांना न भेटताच परदेशात

आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून त्यासाठी बैठका घेण्यात येत आहेत.या बैठकीसाठी प्रत्येक तालुक्यातील प्रमुख नेत्यांना बोलवण्यात आला आहे. त्यांची मतं जाणून घेतली जात आहेत. त्यानुसार इच्छुकांचा अहवाल देखील घेतला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार का याबाबत अजित पवार निर्णय घेणार असून ज्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्या भावनांचा आदर करूनच हा निर्णय घेण्यात येईल आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. गेल्या पंचवीस वर्ष पुणे जिल्हा परिषद हा राष्ट्रवादीचा गड राहिला असून यंदा देखील आम्ही तो गड राखू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

एकच चिन्हा हवे...

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आघाडी झाली तरी एकच चिन्ह असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. चिन्ह कोणतेही असू दे तुतारी असू वा घड्याळ मात्र निवडणूक रिंगणामध्ये उतरताना एका चिन्हावर निवडणूक लढणं आवश्यक आहे. ते कुठलं चिन्ह असेल ते वरिष्ठ निर्णय घेतील परंतु ग्रामीण भागांमधील लोकांचा दोन चिन्ह ठेवली तर गोंधळ उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी झाली तर एकाच चिन्हावर निवडणूक लढवावी यासाठी आम्ही आग्रही असणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

ZP ला पक्षात इन्कमिंग वाढणार

पुणे महापालिका निवडणुकीच्या दरम्यान अखेरच्या टप्प्यामध्ये काही नेते आम्हाला सोडून गेले त्याचा फटका पक्षाला बसला आहे. विशेषता पुणे शहरालगतच्या उपनगरांमधील हे नेते होते. मात्र जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान आउटगोइंग होणार नाही याची काळजी आम्ही घेणार असून त्या उलट मोठ्या प्रमाणात इन्कमिंग पुढील काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल, असे देखील भरणे यांनी सांगितले.

Sharad Pawar Ajit Pawar
Nashik BJP : पराभूत झाल्याच्या रागातून भाजपच्या विजयी उमेदवारावर हल्ला, शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने आले अन् हत्याराने वार..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com