‘बालाजी पार्टीकल’मध्ये मोठा घोळ, याचिका दाखल; खासदार गवळी अडचणीत...

वाशीम जिल्ह्यातील मालेगाव (ता. रिसोड) येथील श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाशी संबंधित हे प्रकरण आहे. शासनाने अनुदान दिल्यानंतर १९९८ साली त्याचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार भावना गवळी यांचे वडील पुंडलिक गवळी या कारखान्याचे अध्यक्ष होते.
Bhawna Gawli - Court Hammer
Bhawna Gawli - Court Hammer
Published on
Updated on

नागपूर : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी MP Bhawna Gawali यांनी बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोळ केल्याची तक्रार शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा Shivsena's Former Corporator Harish Sarda यांनी केली आहे. या प्रकरणी खासदार गवळींवर गुन्हा दाखल करावा, अशा मागणीची याचिका सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणी कोर्टाने प्रतिवाद्यांना नोटीससुद्धा बजावली आहे. The court has also issued notice to defedants. 

न्यायमूर्ती वी. एम. देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, प्लायवूड कारखाना स्थापन करीत लोकांना रोजगार देण्याच्या नावावर गवळी कुटुंबीयांनी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ व राज्य शासनाकडून अनुक्रमे २९ कोटी १० लाखांची आणि राज्य शासनाने १४ कोटी ५५ लाखांचे अनुदान घेतले. मात्र, प्रत्यक्षात कारखाना सुरूच केला नाही. अनेक वर्षानंतर कारखान्याचे मूल्य कमी करीत आपल्याच एका कंपनीला तो विकला. १३ वर्षांचा काळ लोटून गेल्यानंतर आणि ४३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून देखील हा प्रकल्प सुरू झाला नाही. राज्य शासनाने २८ मे २००७ रोजी तो अवसायानात काढला. 

यानंतरही भावना गवळी यांनाच अध्यक्ष बनविण्यात आले. तर, शालिनी पुंडलिकराव गवळी, रामराव जाधव, मोहन काळे आणि मनोहर त्रिभुवन यांना मंडळाचे सदस्य बनविण्यात आले. त्यानंतर, ९ मे २००८ रोजी भावना गवळी यांनी पणन संचालकांना प्रकल्पाला लीजवर देण्याची किंवा विकण्याची परवानगी मागितली. त्यानंतर, निविदा मागविण्यात आल्या. निविदा प्रक्रियेत एकही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे, मिटकॉइन कंपनीकडून कारखान्याचे मूल्यमापन करण्यात आले. या मूल्यांकनात कारखान्याचे मूल्य फक्त ७ कोटी ९ लाख १० हजार रुपये दाखविण्यात आले. २०१० साली या कारखान्याला भावना ॲग्रो प्रॉडक्ट ॲंड सर्विसेस प्रा. लि. ला विकण्यात आले. भावना गवळी यांचे स्वीय सहाय्यक अशोक गांडोळे या कारखान्याचे संचालक आहेत. मूल्यमापनात दाखविण्यात आलेली रक्कम देखील भरली नाही. तसेच, अवसायत मंडळाने देखील ही रक्कम वसूल करण्याबाबत कुठलेही पाऊल उचलले नाही. 

खासदार गवळी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याचिकाकर्त्याने याबाबत रिसोड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल करून घ्यायला प्रशासनाने नकार दिला. त्यामुळे, उच्च न्यायालयामध्ये धाव घेत सीबीआय किंवा ईडीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी विनंती केली आहे. याचिकाकर्ते सारडा यांनी दावा केला आहे की, हे प्रकरण हाती घेतल्यापासून त्यांचा जीव धोक्यात आहे. पोलिस प्रशासनसुद्धा त्यांना सुरक्षा पुरवत नाही. न्यायालयाने प्रतिवादी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग प्रधान सचिव, वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि रिसोड पोलिसांना नोटीस बजावत दहा आठवड्यांमध्ये उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अमोल जलतारे यांनी, शासनातर्फे सहायक सरकारी वकील एस. एम. घोडेस्वार यांनी बाजू मांडली. 

वडिलांनंतर भावना गवळी अध्यक्ष 
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव (ता. रिसोड) येथील श्री बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाशी संबंधित हे प्रकरण आहे. शासनाने अनुदान दिल्यानंतर १९९८ साली त्याचे भूमिपूजन करण्यात आले. खासदार भावना गवळी यांचे वडील पुंडलिक गवळी या कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र, कारखान्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले नाही. कालांतराने या अपूर्ण प्रकल्पाचा खर्च वाढत गेला. राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने १९९८ साली प्रकल्पाचे पुनर्मूल्यांकन करून एकूण ४३ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वडिलांनंतर भावना गवळी कारखान्याच्या अध्यक्ष झाल्या.
Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com