दापोलीत कदम आडनावाच्या उमेदवारांचे पीक !

..
Yogesh-Kadam
Yogesh-Kadam

दाभोळ : नामसाधर्म्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या मतांची विभागणी करण्याच्या रायगड जिल्ह्यातील राजकीय खेळीचे लोण आता दापोली विधानसभा मतदारसंघातही आले असून याचा फटका राजकीय पक्षांच्या उमेदवारांना बसणार आहे.

दापोली विधानसभा मतदार संघातील शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांचा नामसाधर्म्य असलेले योगेश दीपक कदम यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले .

त्याच्यावर कडी करत राष्ट्रवादी चे उमेदवार आ. संजय वसंत कदम यांचे नाम साधर्म्य  असलेले संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम व संजय संभाजी कदम त्यांच्या विरोधात उभे करण्यात आल्याने दोन्ही उमेदवारांना त्याचा फटका बसणार आहे.

2014 च्या रायगड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नावाचे उमेदवार उभे केल्याने त्याचा फटका सुनील तटकरे याना बसला होता फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

आता दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे योगेश कदम व राष्ट्रवादीचे संजय कदम यांना या उमेदवारांचा किती फटका बसेल हे मतमोजणी नंतरच कळेल. दापोली विधानसभा मतदार संघात दाखल झालेल्या   उमेदवारी अर्जाची छाननी नंतर   14 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

 यात योगेश कदम शिवसेना, संजय कदम राष्ट्रवादी, प्रवीण मर्चंडे बसपा, संतोष खोपकर वंचित बहुजन आघाडी, अनंत मोहिते अपक्ष, संजय दगडू कदम, संजय सीताराम कदम, संजय संभाजी कदम, मुश्ताक मिरकर, योगेश दीपक कदम, विकास बटावले, विजय मोरे, सुवर्णा पाटील या अपक्षांचा समावेश आहे.

मुख्य लढत महायुतीचे योगेश कदम, काँग्रेस आघाडीचे संजय कदम व कुणबी समाज पुरस्कृत आघाडीच्या सुवर्णा पाटील यांच्यात होणार आहे 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com