महाजनादेश यात्रेत वीजचोरी : राष्ट्रवादीचा आरोप

महाजनादेश यात्रेत वीजचोरी : राष्ट्रवादीचा आरोप
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत सभेसाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून वीजकंपनीने दोषींवर तात्काळ गुन्हा नोंदवावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या सभेत सरकारी वीज वापरल्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीने चोरीची वीज वापरली जात असेल तर वीज कंपन्यांनी तात्काळ पोलिस चौकीत गुन्हा नोंदवावा, असेही नवाब मलिक म्हणाले. 

मुख्यमंत्र्याना पारदर्शक प्रशासनाचे नाव घेवून केवळ भाषण करता येते मात्र पारदर्शक कारभार करता येत नाही. मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्याचे घोटाळे उघड झाल्यानंतर देखील त्यांना पाठिशी घालण्यातच मुख्यमंत्र्यांनी धन्यता मानल्याने या वीज चोरीबाबतही ते गप्पच राहतील. पण, वीच कंपनीने मात्र सामान्य ग्राहकांना जो न्याय दिला जातो तोच न्याय मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी वीज चोरणारांनाही लावावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com