गडचिरोली : नक्षलग्रस्त, दुर्गम आणि मागासलेला भाग म्हणून ज्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघाकडे बघितले जाते. त्या अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी तीन डॉक्टरांची उमेदवारी सध्या चर्चेत आहे.
यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. निवडणुकीचा महासंग्राम चांगलाच रंगणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. या मतदारसंघात पूर्वीप्रमाणे आताही कॉंग्रेस आणि भाजपमध्ये युद्ध होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने या दोन्ही पक्षांनी मतदारसंघात आपापली ताकद आजमावणे सुरू केले आहे.
कॉंग्रेसच्या तिकिटावर लढू इच्छिणाऱ्या तीन डॉक्टरांचा समावेश आहे. उच्चविद्याविभूषित असे हे तीनही डॉक्टर्स सध्या आपापल्यापरीने कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी दावेदारी करीत आहेत. यात आहेत, युवा नेते डॉ. नितीन कोडवते. दुसरे आहेत ज्येष्ठ नेते डॉ. नामदेव किरसान आणि तिसरे आहेत, गडचिरोली जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. या तीनही नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी चालविली असून त्यादिशेने त्यांची वाटचाल देखील सुरू झाली आहे.
सध्याचे भाजपचे खासदार अशोक नेते मूळचे वर्धा जिल्ह्यातील आहेत. बाहेरच्या उमेदवाराची पार्सल परत पाठवा, या मुद्यावरून स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा राजकीय रंग देण्याचा कॉंग्रेसचा विचार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.