प्रकाश आंबेडकरांची बदनामी करणाऱ्या कांबळेंविरूद्ध गुन्हे दाखल करा...

कांबळे यांनी 25 डिसेंबर रोजी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी कारक मजकूर प्रसारित केला. राष्ट्रीय सेवा संघाचे दलाल अशा शब्दांत टीका केली.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

तिवसा : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश उपाध्यक्ष जबाबदार पदाधिकारी असलेल्या स्नेहल कांबळे यांनी फेसबुकवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे, अशी मागणी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी केली.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर सोशल मिडियावर प्रसारित करून स्नेहल कांबळे या महिलेने त्यांचा अपमान केला आहे. प्रकाश आंबेडकर हे देशातील तमाम बहुजन समाजाचे नेते असून त्यांच्याबद्दल जनमानसात आदर आहे. सदर पोस्टमुळे वंचित बहुजन आघाडीसह आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून स्नेहल कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी  करण्यात आली आहे. 

तक्रार सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांच्यासह सतीश यावले, तालुका अध्यक्ष सुमित सोनोने, शहरअध्यक्ष संदीप मकेश्वर, प्रवीण निकाळजे, राहुल गोपाळे, बबलू मुन्द्रे, राजकुमार आसोडे, गजानन आसोडे, धनंजय आसोडे, भाष्कर आसोडे, सम्यक हगवणे, रोशन खडसे उपस्थित होते.

स्नेहल कांबळे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी महासभेच्या प्रदेश उपाध्यक्ष असून कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कांबळे यांनी 25 डिसेंबर रोजी स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वंचित आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी कारक मजकूर प्रसारित केला. राष्ट्रीय सेवा संघाचे दलाल अशा शब्दांत टीका केली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com