नगर : कोपर्डी प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी न्यायालयात निघालेले शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीवर भोर यांना अडविण्यात आले. त्यामुळे भोर व पोलिसांत काहीवेळ वादावादी झाली.
कोपर्डी प्रकरणानंतर भोर यांनी आक्रमकपणे भूमिका घेतली होती. त्यांनी आंदोलने केली, त्याबरोबरच दलित नेत्यांना कोपर्डीत येण्यास विरोध केला. त्यानंतर काही दिवसांत भोर यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली होती. आज (बुधवार) अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात निकालाला काही मिनीटे अवधी राहिला असताना भोर तिथे आले, मात्र पोलिसांनी त्यांना आत सोडण्यास नकार दिला. त्यामुळे जोरदार वादावादी झाली. अखेर भोर यांना न्यायालयात जावू देण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.