कारची किरकोळ धडक, अन् दोघांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्षांना केली मारहाण !

धक्का लागलेलाकारचालक व श्री. गोंडाणे यांच्यामध्ये रस्त्यावरच शाब्दिक वाद झाला. दुसऱ्या कारमधील दोघांनी श्री. गोंडाणे यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली, असा आरोप नितीन गोंडाणे यांनी गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला.
Crime
Crime

अमरावती : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांचे वडिल रुग्णालयात भरती आहेत. त्यांना बघून घरी परत जात असताना श्री गोंडाणे यांच्या कारची किरकोळ धडक दुसऱ्या कारला लागली. त्यावरुन त्या कारमधील दोघांनी श्री गोंडाणे यांना मारहाण केली. मारहाणीदरम्यान सळ्यातील सोन्याची चेन हिसकावल्याचा आरोप गोंडाणे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. 

शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. श्री. गोंडाणे यांच्या वडिलांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते एमएच 27 बीई 4313 क्रमांकाच्या कारने वडिलांची भेट घेऊन परत घराकडे जात होते. तेव्हा रात्री बियाणी चौकात त्यांच्या कारचा धक्का दुसऱ्या कारला लागला. त्याचवेळी धक्का लागलेला कारचालक व श्री. गोंडाणे यांच्यामध्ये रस्त्यावरच शाब्दिक वाद झाला. दुसऱ्या कारमधील दोघांनी श्री. गोंडाणे यांना मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेली, असा आरोप नितीन गोंडाणे यांनी गाडगेनगर ठाण्यात दाखल तक्रारीत केला. या घटनेनंतर मार्गावर बरेच लोक जमले होते. 

केवळ किरकोळ धडक लागल्यावरुन गोंडाणे यांना मारहाण करण्यात आली की यामागे आणखी काही कारण आहे, याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. क्षुल्लक कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्यामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा होत आहे. 

कारचालकास धक्का लागल्यानंतर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने धक्काबुक्की करून चेन हिसकावल्याने पोलिसांत तक्रार नोंदविली.
-नितीन गोंडाणे, माजी अध्यक्ष, जि. प. अमरावती.

श्री. गोंडाणे यांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर त्यांना धक्काबुक्की करून चेन लुटल्याची तक्रार प्राप्त झाली. त्याप्रकरणाची चौकशी केली जाईल.
-मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे.
Edited By : Atul Mehere
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com