

मुंबई :सायन-पनवेल महामार्गातील झालेल्या गैरकाराभाराबाबत महालेखाकारांनी यापूर्वीच ठपका ठेवला आहे. या महामार्गासाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत झालेल्या गैरकाराभाराची एसीबीकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
यामुळे ही चौकशी पूर्ण होण्यासाठी या महामार्गातील गैरकारभारातील दोषींवर कारवाई करावी अशी शिफारस आज लोकलेखा समितीने केली आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत आज समितीकडून 2015-16 चा अहवाल सादर करण्यात आला.
यात राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित कॅगने 2013-14 या वर्षीच्या आर्थिक क्षेत्र अहवालात ठपका ठेवलेल्या प्रकरणांचा अहवाल सादर करण्यात आला. यात सायन-पनवेल महामार्गासोबत इतर कामासाठी कंत्राटे देताना विश्वार्हतता आणि पारदर्शकता आणण्यासाठी पुनर्निविदा काढण्याची आणि भविष्यात ई-निविदा पद्धतीचा अवलंब करावा अशी समितीने शिफारस केली आहे.
सायन-पनवेल महामार्गासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेत निश्चित अटी, शर्तींमध्ये सुस्पष्टता नसल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या प्रकल्पाची अनेक कामे अद्यापही अपूर्ण असल्याने समितीने नाराजी व्यक्त केली आहे.
सार्वजनिक महत्वाचा हा प्रकल्प असून मोठया प्रमाणात नागरिकांच्या सुविधेशी संबंधित असल्यामुळे या प्रकरणी शासनाने तातडीने योग्य ती बाजू न्यायालयात आपल्या बाजूने निकाल लागेल अशी पूर्ण तयारी करावी.
तोपर्यंत रस्त्याच्या कामाचा खोळंबा होऊ नये व न्यायालयात प्रलंबित प्रकरणाची काही बाधा नसल्यास सरकारने हे प्रलंबित काम तूर्त स्वखर्चाने पूर्णा करावे व त्याची नंतर भरपाई कंत्राटदाराकडून करावी अशीही शिफारस समितीने केली आहे.
अनेक कंत्राटदार रस्त्यांची देखभाल आणि दुरूस्ती करत नाहीत, यामुळे त्याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतात यासाठी निविदांच्या वेळीच कंत्राटदारांकडून रस्त्याचे आयुष्य, देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात यावी व याचा आढावा विभागाकडून वेळोवेळी घेण्यात यावा.
रस्त्यांच्या तक्रारीबाबत विभागाकडून एक स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्यात यावी, यामुळै लोकांना रस्त्यांच्या तक्रारींबाबत ऑनलाईन सूचनाव तक्रारी दाखल करून सरकारच्या निदर्शनास आणून देता येईल अशीही लोकलेखाच्या अहवालात करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.