माझे काय चुकले ते पक्षाने सांगावे : पी. एन. पाटील

मला मुंबईतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एखादे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले महामंडळाचे अध्यक्षपददेण्याचे आश्‍वासन दिले होते, पण मी ही ऑफर नाकारली आहे.
P-N-Patil
P-N-Patil
Published on
Updated on

कोल्हापूर :  गेली चाळीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहीलो, अडचणीच्या काळात पक्षाचे काम केले.  चारवेळा पराभूत होऊनही पक्ष सोडण्याचा विचारही कधी मनात आली नाही.  तरीही मला मंत्रीपदासाठी डावलले जात असेल तर माझे काय चुकले हे पक्षाने सांगावे, अशा शब्दात कॉंग्रेसचे नाराज आमदार पी. एन. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी तर नाराज आहेच पण माझे कार्यकर्तेही नाराज असून पुढील निर्णय कार्यकर्ते काय सांगतील त्यावर घेऊ, असेही श्री. पाटील म्हणाले.


मंत्रीमंडळात डावलल्याने पी. एन. यांच्यासह त्यांचे समर्थक नाराज आहेत. त्यातून पी. एन. यांच्या कार्यकर्त्यांचा आज मेळावा झाला, त्यात अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनाम्याचा इशारा दिला. या पार्श्‍वभुमीवर पी. एन. पाटील यांच्याशी संपर्क साधला.


ते म्हणाले,"कॉंग्रेसशिवाय आपल्या डोक्‍यात कधीही दुसरा विचार आला नव्हता. विधानसभेच्या चार निवडणुकीत आपला पराभव झाला तरीही पक्ष सोडावा असे कधी वाटले नाही. पण यावेळी मला डावलण्यात आले. त्यातून माझ्यासह कार्यकर्त्यांत नाराजी आहे. केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यातील इतर जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्येही नाराजीचे वातावरण आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.''


पर्यायाबाबत विचारले असता ते म्हणाले,"मला मुंबईतच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एखादे कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असलेले महामंडळाचे अध्यक्षपद  देण्याचे आश्‍वासन दिले होते, पण मी ही ऑफर नाकारली आहे. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मी बोललो आहे, त्यांनीच आता माझी चूक काय झाली ते सांगावे.''

मनधरणीचे प्रयत्न सुरू
श्री. पाटील यांच्या नाराजीचे तीव्र पडसाद प्रदेश कॉंग्रेस कमिटीत उमटले असून त्यातून आज प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पी. एन. यांच्याशी संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यासाठी कॉंग्रेस नेत्या श्रीमती सोनिया गांधीची भेट घडवून देण्याचा शब्दही श्री. थोरात यांनी दिला. प्रसंगी राहूल गांधी यांच्याशी संपर्क साधून देऊ पण कोणातही निर्णय घेऊ नका असे श्री. थोरात यांनी त्यांना सांगितले आहे.


श्री. थोरात यांच्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनीही पी. एन. यांच्याशी आज फोनवरून चर्चा केली. तुम्ही मुंबईत माझ्या भेटीला या, तोपर्यंत माध्यमांकडे जाऊ नका असा सल्ला श्री. पवार यांनी त्यांना दिला आहे, असे समजते . 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com