खासदार संजय धोत्रे यांना केंद्रीय कृषीमंत्री पद ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानसभा निवडणूक, त्यांचे परफेक्‍ट नियोजन विजय प्राप्त करून देणारे ठरले.
Sanjay-Dhotr-MP-BJP.
Sanjay-Dhotr-MP-BJP.

अकोला : केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी होणारे खासदार संजय धोत्रे यांचा अनुभव बघता नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. यानिमित्ताने भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न खासदार संजय धोत्रे यांनी साकारले आहे.

सतराव्या लोकसभेत भारतीय जनता पक्षाने तिनशेपेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. मोदी यांच्या दिल्लीतील टीममध्ये अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचे वजन वाढले आहे. राज्यात विक्रमी मताधिक्‍य घेत धोत्रे सलग चौथ्यांदा संसदेत पोहोचले आहेत.

 2019 च्यानिवडणुकीनंतर मोदी सरकारमध्ये धोत्रे यांची वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र, त्यांना महाराष्ट्रातील खासदार गटाचे नेतेपद देवून बोळवण करण्यात आली होती. त्यानंतर गतवर्षी त्यांना महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे (एमसीएईआर) उपाध्यक्षपद व या पदाला कॅबिनेटचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

आता ते सलग चौथ्यांना संसदेत पोहोचले आहेत. त्यांना कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि महाबीजसारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केले आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात कृषी सारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाल्यामुळे दिल्ली दरबारात अकोल्याचे वजन वाढले आहे.

यशस्वी नेतृत्व
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत की विधानसभा निवडणूक, त्यांचे परफेक्‍ट नियोजन विजय प्राप्त करून देणारे ठरले. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षश्रेष्ठीपुढे केलेल्या उमेदवारांची शिफारस व मतदारसंघात केलेले नियोजन लक्षवेधी ठरले. जिल्ह्यात त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा सफाया झाला. महापालिका निवडणुकीत घवघवीत यश प्राप्तकेले.

विविध शासकीय खात्यांचे सदस्य
धो
त्रे यांनी जिल्ह्यात भाजपाची पाळेमुळे रुजवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. प्रत्येक गावात त्यांनी कार्यकर्ता जोडण्यासाठी काम केले.  राजकीय परिपक्व क्षमतेमुळे त्यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली.


2018 मध्ये त्यांना कॅबीनेट'मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृषी
शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तत्पूर्वी ते महाराष्ट्र राज्य रोजगार निवड मंडळाचे सदस्य होते. महाराष्ट्र वन्यजीव संरक्षण समितीवर असताना त्यांनी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी विविध
उपाययोजना सुचविल्या. 2004 पासून ते अकोला येथे रेल्वेच्या अंदाजपत्रक समितीवर कार्यरत आहेत. एमसीएईआरचे उपाध्यक्ष म्हणून त्यांचे काम अतुलनीय
आहे.  संरक्षण मंत्रालयाच्या  संसदीय सल्लागार समितीचे सदस्य राहिले आहेत . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com